Bangladesh MP Murdered: बांगलादेशच्या खासदारांच्या हत्येत हनीट्रॅपचा वापर? महिलेला पोलिसांनी घेतलं ताब्यात, कसा रचला हत्येचा कट

Bangladesh MP Murdered: बांगलादेशमधून ताब्यात घेण्यात आलेल्या महिलेचे नाव शिलांती रहमान आहे. या हत्येचा सूत्रधार अक्तारुझमान शाहीनची ती प्रेयसी असल्याचे बोलले जात आहे. ज्या वेळी खासदार अनवारुल यांची हत्या झाली. तेव्हा ती कोलकात्यात होती आणि 15 मे रोजी या हत्याकांडातील मुख्य संशयित, खुनी अमानुल्ला अमानसोबत ढाका येथे परतली होती.
Bangladesh MP Murdered
Bangladesh MP MurderedEsakal
Updated on

नवी दिल्ली- बांग्लादेश सत्ताधारी पक्षाचे खासदार अनवारुल अजीम अनवर यांची भारतात हत्या झाली आहे. हे प्रकरण सध्या गाजत आहे. याप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. अनवारुल यांची हत्या त्यांचाच मित्र आणि बिझनेस पार्टनरने पैशाच्या वादावरुन केली आहे. ढाका ट्रिब्युनच्या रिपोर्टनुसार, अकतारुज्जमान शाहीन याने कट रचून त्यांची हत्या केली आहे. यामध्ये त्याने काही मित्रांची देखील मदत घेतली आहे.

बांगलादेशचे खासदाप अनवारूल अझीम अनार यांच्या हत्येनंतर रोज नवे खुलासे समोर येत आहे. खासदारांची हत्या झाल्यानंतर अनावारूल यांच्या हत्येनंतर त्यांच्या लहानपणीच्या मित्रापासून ते त्यांच्या हत्येसाठी पाच करोड रूपयांची सुपारी घेतल्याचे तसेच या प्रकरणात हनीट्रॅप केल्याचा संशय देखील व्यक्त केला जात आहे. आता बातमी अशी आहे की, बांगलादेश पोलिसांनी एका महिलेला ताब्यात घेतले आहे. या महिलेच्या माध्यमातून खासदाराला हनीट्रॅप करण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या महिलेचे नाल शिलांती रहमान आहे. ती बांगलादेशची नागरीक आहे. बांगलादेश पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणाचा मास्टरमाइंड अकतारुज्जमान शाहीनची ती प्रेयसी आहे. ज्यावेळी खासदार अनवारूल अझीम अनार यांची हत्या झाली त्यावेळी ती कोलकतामध्ये होती. 15 मे रोजी, ती या हत्याकांडातील मुख्य संशयित, खुनी अमानुल्लाह अमानसह ढाक्याला परतली.

Bangladesh MP Murdered
Bangladesh MP Murdered: बांग्लादेशच्या खासदाराची भारतात कशी झाली हत्या? कट कोणी रचला? धक्कादायक खुलासा

बांगलादेशातून खासदाराला कोलकाता येथे बोलावण्यासाठी अकतारुज्जमानने शिलांतीचा हनीट्रॅप म्हणून वापर केल्याचे पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे. याप्रकरणी बांगलादेशात अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या जबाबाच्या आधारे शिलांतीला ताब्यात घेण्यात आले आहे.

बांगलादेश खासदाराच्या हत्येप्रकरणी पश्चिम बंगाल सीआयडीने पहिली अटक केली आहे. जिहाद हवालदार नावाच्या व्यक्तीला पश्चिम बंगाल सीआयडीने अटक केल्याचे सीआयडी सूत्रांचे म्हणणे आहे. जिहाद हा व्यावसायिक कसाई आहे. हे काम करण्यासाठी त्याला खुनाचा सूत्रधार अकतारुज्जमान याने खास मुंबईहून बोलावले होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन महिन्यांपूर्वी जिहादला या कामासाठी नियुक्त करून मुंबईहून कोलकाता येथे बोलावण्यात आले होते. पाच कोटी रुपयांच्या सुपारीचा एक भागही जिहादला देण्यात आला होता. कोलकाता विमानतळाजवळील एका हॉटेलमध्ये ते थांबले होते. या हत्येसाठी खासदार अनवारुल यांच्या जवळच्या मित्राने 5 कोटी रुपयांचे कंत्राट दिल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. खासदाराचा हा मित्र अमेरिकन नागरिक आहे.

तपासानुसार, बांगलादेशी खासदार अनवारुल यांचा बालपणीचा मित्र अकतारुज्जमान शाहीन याने व्यावसायिक वैमनस्यातून खासदाराच्या हत्येचा कट रचला होता. शाहीन हा झेनैदहची रहिवासी आहे. त्याच्याकडे अमेरिकन नागरिकत्वही आहे. त्यांचे भाऊ झेनैदहच्या कोटचंदपूर नगरपालिकेचे महापौर आहेत. अनवारुल हे झेनैदहचे खासदार होते.

Bangladesh MP Murdered
Bangladesh MP Missing: भारतात आलेला बांगलादेशचा खासदार 3 दिवसांपासून बेपत्ता; कुटुंबाकडून चिंता व्यक्त

शाहीन 30 एप्रिल रोजी अमन आणि त्याची गर्लफ्रेंड सिलिस्टा रहमानसोबत कोलकाता येथे गेला होता. कोलकाता येथील संजीबा गार्डनमध्ये त्यांनी डुप्लेक्स भाड्याने घेतले होते. शाहीनचे दोन सहकारी सयाम आणि जिहाद आधीच कोलकात्यात होते. दोघांनी मिळून हत्येचा कट रचला.

शाहीन १० मे रोजी बांगलादेशला परतला. हत्येची संपूर्ण जबाबदारी त्याने अमनवर सोपवली. योजनेनुसार अमनने बांगलादेशातून आणखी दोघांना कोलकात्यात बोलावले. फैजल शाजी आणि मुस्तफिज 11 मे रोजी कोलकाता येथे गेले आणि या कटात सामील झाले.

खासदाराची हत्या कशी झाली?

गुप्तचर अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमनकडून मिळालेल्या माहितीनुसार, शाहीनला आधीच माहिती होती की खासदार 12 मे रोजी कोलकाता येथे जाणार आहेत. त्याने अमनला हत्येची सर्व तयारी करण्यास सांगितले. हत्येसाठी त्याने काही धारदार शस्त्रेही खरेदी केली होती.

खासदार अनवारुल 12 मे रोजी दर्शन सीमेवरून कोलकाता येथे गेले होते. पहिला दिवस ते त्यांचा मित्र गोपाल यांच्या घरी राहिले. दरम्यान, मारेकऱ्याने त्यांना 13 मे रोजी आपल्या फ्लॅटवर बोलावले.

13 मे रोजी अनवारुल हे संजीबा गार्डनमधील अमनच्या अपार्टमेंटमध्ये गेले होते. दरम्यान, अमानने त्याचे साथीदार फैजल, मुस्तफिज, सयाम जिहाद या दोघांना पकडले. तसेच अनवारुल शाहीनला पैसे परत करण्यास सांगितले. या गोंधळात त्याने अनवारुलचे तोंड उशीने दाबून त्यांची हत्या केली आहे. हत्येनंतर अमनने शाहीनला याची माहिती दिली.

अमनकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे गुप्तचर अधिकाऱ्यांनी सांगितले की, शाहीनच्या सूचनेनुसार अनवारुलच्या शरीराचे तुकडे करण्यात आले जेणेकरून त्याची सहजपणे विल्हेवाट लावता येईल. त्यासाठी फ्लॅटजवळील एका शॉपिंग मॉलमधून दोन मोठ्या ट्रॉली बॅग आणि पॉलिथिनची खरेदी करण्यात आली. या पॉलिथिनच्या पिशव्या आणि ट्रॉलीमध्ये मृतदेहाचे तुकडे ठेवण्यात आले होते.

घटनेच्या रात्री मृतदेह फ्लॅटमध्ये ठेवण्यात आला होता. दरम्यान, मारेकऱ्यांनी बाहेरून ब्लिचिंग पावडर आणून त्याद्वारे फ्लॅटमधील रक्ताचे डाग साफ केले.

मिळालेल्या माहितीनुसार, कोलकाता पोलिसांकडे त्या फ्लॅटचे आणि आजूबाजूच्या इमारतींचे सीसीटीव्ही फुटेज आहेत. या फुटेजमध्ये अमन आणि त्याचे सहकारी खासदार अनवारुल यांच्या फ्लॅटबाहेर ठेवलेली ट्रॉली बॅग आणि शूज काढून घेत असल्याचे दाखवण्यात आले आहे. याशिवाय शाहीनची महिला मैत्रिण बाहेरून पॉलिथिन बॅग आणि ब्लिचिंग पावडर आणत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून उघड झाले आहे.

हत्येनंतर अमनच्या सांगण्यावरून त्याच्या दोन साथीदारांनी खासदार अनवारुल यांचे दोन्ही फोन घेतले आणि खासदाराच्या लोकेशनबाबत तपास करणाऱ्यांचा संभ्रम व्हावा म्हणून वेगवेगळ्या दिशेने गेले. नंतर 17 मे रोजी फैजल आणि मुस्तफिज बांगलादेशला परतले.

Bangladesh MP Murdered
Bangladesh MP Murdered: बांग्लादेशच्या खासदाराची भारतात कशी झाली हत्या? कट कोणी रचला? धक्कादायक खुलासा

मुख्य आरोपी शाहीन अमेरिकेत गेला पळून

सूत्रांचे म्हणणे आहे की, खासदाराच्या हत्येची योजना आखून अकतारुज्जमान शाहीन 10 मे रोजी ढाका येथे परतला होता. खासदार बेपत्ता झाल्याची बातमी देशभरात गाजली तेव्हा तो १८ मे रोजी भारतमार्गे नेपाळला गेला. 21 मे रोजी तो नेपाळहून दुबईला रवाना झाला. 22 मे रोजी ते दुबईहून अमेरिकेला रवाना झाला.

हत्येचा संबंध सोन्याच्या तस्करी प्रकरणाशी

अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, खासदार अनवारुलच्या यांच्या हत्येमागे सोन्याच्या तस्करीच्या पैशाच्या वितरणाशी संबंधित वाद आहे. अक्तारुझमान शाहीन हा सोन्याचा तस्कर असून खासदार अनवारुलच्या यांच्यावरही सोन्याच्या तस्करीचे आरोप असल्याचे बोलले जात आहे.

अनवारुल हे अवामी लीगच्या तिकिटावर 2014, 2018 आणि 2024 मध्ये झेंडेई-4 मतदारसंघातून सलग तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.