Sheikh Hasina : बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीनांनी घेतली मोदींची भेट; म्हणाल्या, मला भारतात..

दोन्ही नेत्यांची आज महत्त्वाची बैठक होणार आहे.
Sheikh Hasina Narendra Modi
Sheikh Hasina Narendra Modiesakal
Updated on
Summary

दोन्ही नेत्यांची आज महत्त्वाची बैठक होणार आहे.

भारत दौऱ्यावर आलेल्या बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना (Bangladesh PM Sheikh Hasina) यांचं आज (मंगळवार) राष्ट्रपती भवनात (Rashtrapati Bhavan) औपचारिक स्वागत करण्यात आलं. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) राष्ट्रपती भवनात पोहोचले आणि बांगलादेशच्या पंतप्रधानांचं जोरदार स्वागत केलं.

दोन्ही नेत्यांची आज महत्त्वाची बैठक होणार असून त्यात नदी पाणीवाटपासह महत्त्वाच्या क्षेत्रात करार होऊ शकतो, असं मानलं जातंय. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या भारत दौऱ्याच्या प्रारंभी सांगितलं की, 'कोणतीही समस्या मैत्रीतून सोडवली जाऊ शकते. मी भारत आणि बांगलादेश यांच्यात सकारात्मक संवादाची अपेक्षा करत आहे. जेव्हा आपला देश (बांगलादेश) स्वतंत्र झाला, तेव्हा भारतानं आणि भारतातील जनतेनं आम्हाला पाठिंबा दिला. त्या काळात भारतानं दिलेल्या योगदानाचं मी आभार मानतो.'

Sheikh Hasina Narendra Modi
BJP : अशोक चव्हाणांसह विश्वजीत कदम भाजपमध्ये जाणार? प्रवेशावर काँग्रेस नेत्याचं स्पष्टीकरण

पंतप्रधान हसीना पुढं म्हणाल्या , 'आमचं प्राधान्य लोकांच्या समस्या सोडवणं, गरिबी हटवणं आणि अर्थव्यवस्था विकसित करणं हे आहे. या समस्यांसह आम्ही दोन्ही देश एकत्र काम करतो. जेणेकरून भारत आणि बांगलादेशातच नव्हे, तर संपूर्ण दक्षिण आशियातील लोकांना चांगलं जीवन मिळू शकेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Sheikh Hasina Narendra Modi
Arvind Giri : पाच वेळा आमदार राहिलेल्या भाजपच्या अरविंद गिरींचं चालत्या गाडीतच निधन

भारत खूप काही करू शकतो : पंतप्रधान हसिना

याआधी सोमवारी पंतप्रधान हसीना म्हणाल्या होत्या की, रोहिंग्या निर्वासितांच्या प्रश्नावर भारत आपल्या देशाला मदत करण्यासाठी खूप काही करू शकतो. सीमेपलीकडील नद्यांचं पुनरुज्जीवन करण्यासाठी दोन्ही देश एकत्रितपणे काम करू शकतात, असं त्या म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.