Bank Holidays: ऑगस्टमध्ये बँकांना अर्धा महिना सुट्ट्या, पहा सुट्ट्यांची लिस्ट

तुम्हाला माहिती आहे का की या १३ सुट्ट्या कधी असणार? चला तर जाणून घेऊया.
Bank Holidays August 2022
Bank Holidays August 2022sakal
Updated on

ऑगस्ट हा सुट्ट्यांसाठी खास महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्यात जास्तीत जास्त सण येत असतात. त्यामुळे या सुट्ट्यांमुळे बँकेची कामे रखडतात. बँकेशी संबधित तुमचं काही काम असेल तर ते काम लगेच पूर्ण करा. कारण ऑगस्टमध्ये अर्धा महिना बँकेला सुट्टी असणार आहे. होय. तब्बल १३ दिवस बँकेला सुट्टी असणार आहे.

तुम्हाला माहिती आहे का की या १३ सुट्ट्या कधी असणार? चला तर जाणून घेऊया.

Bank Holidays August 2022
Bank Holidays : जुलैमध्ये 14 दिवस बँका राहणार बंद; पाहा संपूर्ण सुट्ट्यांची यादी

बँक हॉलिडे हे प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळे असतात. त्यामुळे सुट्ट्या जाणून घेणे गरजेचे आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानी बँक सुट्ट्यांची लिस्ट जारी केली आहे. त्यांच्या वेबसाइटला भेट देऊन तुम्ही सुट्ट्यांची लिस्ट तपासू शकता.

Bank Holidays August 2022
Bank Holiday : जून महिन्यात 'इतक्या' दिवस बँका राहणार बंद

बँक सुट्ट्यांची यादी –

1 ऑगस्ट – द्रुपका शे-जी उत्सव (गंगटोक)
7 ऑगस्ट– पहिला रविवार
8 ऑगस्ट – मोहरम (जम्मू आणि श्रीनगर)
9 ऑगस्ट – चंदीगड, गुवाहाटी, इंफाळ, डेहराडून, शिमला, तिरुवनंतपुरम, भुवनेश्वर, जम्मू, पणजी, शिलाँग वगळता मोहरम (आशुरा) निमित्त देशातील इतर ठिकाणी बँका बंद राहतील.
11 ऑगस्ट – रक्षाबंधन (देशभरात सुट्टी)
13 ऑगस्ट – दुसरा शनिवार
14 ऑगस्ट – रविवार
15 ऑगस्ट – स्वातंत्र्य दिन
16 ऑगस्ट – पारशी नववर्ष (मुंबई आणि नागपूरमध्ये सुट्टी)
18 ऑगस्ट – जन्माष्टमी (देशभर सुट्टी)
21 ऑगस्ट – रविवार
28 ऑगस्ट – रविवार
31 ऑगस्ट 2022 – गणेश चतुर्थी (गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटकमध्ये बँका बंद राहतील.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.