Hijab : बँक अधिकारी मुस्लिम विद्यार्थिनीला म्हणाले, ...तरच पैसे देणार

Bank refuses to pay the student for wearing hijab
Bank refuses to pay the student for wearing hijabBank refuses to pay the student for wearing hijab
Updated on

बिहारच्या बेगुसरायमध्ये शावा तबस्सुम ही विद्यार्थिनी हिजाब परिधान करून पैसे काढण्यासाठी बँकेत पोहोचली. परंतु, बँकेतील अधिकाऱ्यांनी पैसे देण्यास नकार दिल्याचा आरोप तिने केला. ‘आधी हिजाब काढा, मग पैसे देतो’ असे अधिकाऱ्यांनी म्हटल्याने विद्यार्थिनी आणि वडिलांनी कर्मचाऱ्यांनी वाद घातला. त्याचा व्हिडिओही त्यांनी बनवला होता. आता हा व्हिडिओ चांगलाच चर्चेला जात आहे.

मन्सूरचक ब्लॉकमधील कस्तुरी गावातील रहिवासी मोहम्मद मतीन आलम यांची मुलगी शावा तबस्सुम १० फेब्रुवारी रोजी मन्सूरचक युको बँकेत (Bank) पैसे काढण्यासाठी गेली होती. पैसे काढण्याची स्लीप भरल्यानंतर त्यांचा नंबर आला तेव्हा बँकेच्या कॅशिअरने हिजाब काढल्यानंतरच पैसे दिले जातील असे सांगितले. शावाने विरोध करीत ‘आम्ही हिजाब काढणार नाही, पैसे घेणार’ असल्याचे सांगितले. खूप वाद होऊनही पैसे न मिळाल्याने वडील आणि भावाला फोन केला. त्यानंतर वाद होऊन पैसे देण्यात आले.

विद्यार्थिनीचे म्हणणे आहे की, ती याआधीही हिजाबमध्ये पैसे काढण्यासाठी बँकेत गेली होती. त्यावेळी कोणीही तिच्यावर आक्षेप घेतला नाही. मात्र, यावेळी हिजाब काढल्यानंतरच पैसे देऊ, असे बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे तिचे म्हणणे आहे. कर्नाटकातील (karnataka) हिजाब वादानंतर वातावरण चांगलेच तापले आहे. व्हिडिओमध्ये विद्यार्थिनी बँक कर्मचाऱ्यांवर आरोप करीत आहे. व्हिडिओमध्ये मुलीचे वडील बँक कर्मचाऱ्यांची उलटतपासणी करीत आहेत. हिजाब (Hijab) काढण्यास सांगण्यात आल्याचा आरोप ते करीत आहे.

Bank refuses to pay the student for wearing hijab
मोठी बातमी : आमदार रवी राणा यांना महाराष्ट्रात येण्याची परवानगी

चौकशीनंतरच काही सांगता येईल

या संदर्भात युको बँकेच्या झोन कार्यालयातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगितले. चौकशीनंतरच काही सांगता येईल, असे सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()