नवी दिल्ली :
जर तुमच्या बँक खात्यात अचानक हजारो रुपये जमा झाले तर तुमची भावना काय असेल? खरंतर तुमचा आनंद गगनात मावणार नाही. असाच काहीसा प्रकार एका कॅब ड्रायव्हरबाबत घडला आहे. या कॅब ड्रायव्हरला तर आपण टाटा-बिर्लाच झाल्याचं फील झालं.
त्याच कारण म्हणजे या ड्रायव्हरच्या बँक खात्यात हजार-दोन हजार किंवा पन्नास हजार नव्हे तर तब्बल 9,000 कोटी रुपये जमा झाले. पण ज्या बँकेकडून चुकून हे ट्रान्झॅक्शन झालं, त्या बँकेच्या सीईओला घरचा रस्ता दाखवण्यात आला. इंडिया टुडेनं याबाबत वृत्त दिलं आहे. (Bank Transfer cab driver got lottery 9000 crores transfer in his account resignation by Bank CEO)
तामिळनाडू मर्कन्टाईल बँकेचे (TMB) सीईओ एस. कृष्णन यांच्यावर राजीनामा देण्याची वेळ आली. कारण त्यांच्या बँकेनं चुकून चेन्नईतल्या एका कॅब ड्रायव्हरच्या खात्यात तब्बल ९००० कोटी रुपये ट्रान्सफर केले. या चुकीसाठी कृष्णन यांना मोठी किंमत मोजावी लागली. पण आपण वैयक्तिक कारणानं राजीनामा देत आहोत असं त्यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटलं आहे. (Marathi Tajya Batmya)
कृष्णन यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटलं की, बँकेतील माझी अद्याप दोन तृतीयांश सेवेचा काळ बाकी आहे. पण माझ्या वैयक्तिक कारणासाठी मी बँकेच्या एमडी आणि सीईओपदाचा राजीनामा देत आहे. (Latest Marathi News)
थुतूकुडूमधील या बँकेच्या संचालक मंडळानं कृष्णन यांचा राजीनामा स्विकारला असून तो रिझर्व्ह बँकेकडं पाठवून दिला आहे. तसेच आरबीआयकडून याबाबत पुढील आदेश येईपर्यंत कृष्णन यांना पदावर कायम राहता येणार आहे, असं बँकेनं आपल्या निवेदनात म्हटलं आहे.
तामिळनाडू मर्कन्टाईल बँकेत चेन्नईतील एका कॅब ड्रायव्हरचं खात आहे. त्याच्या खात्यात ९००० कोटी रुपये बँकेनं चुकून ट्रान्सफर केले. पण हा फ्रॉड तर नाही ना? याची खात्री करण्यासाठी या कॅब ड्रायव्हरनं या पैशांपैकी २१,००० रुपये आपल्या मित्राच्या खात्यात ट्रान्सफर केले.
पण हे पैसे सहजरित्या ट्रान्सफर झाले. पण अर्ध्या तासातंच बँकेनं उर्वरित सर्व रक्कम बँकेनं पुन्हा काढून घेतले. दरम्यान, याच वर्षी जून महिन्यात इन्कम टॅक्स विभागानं व्हेरिफिकेशन प्रक्रियेदरम्यान या बँकेच्या व्यवहारांमध्ये अनियमितता असल्याचा इशारा दिला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.