Patna Meeting : पाटण्यात झळकले 'पन्नास खोके एकदम ओके'चे बॅनर; राष्ट्रवादी युवक काँग्रेसने...

Patna Meeting
Patna Meetingesakal
Updated on

पाटनाः देशभरातल्या विरोधकांची आज बिहारच्या पाटना येथे बैठक होत आहे. या बैठकीसाठी देशभरातले सर्वच महत्त्वाचे नेते दाखल झालेले आहेत.

दरम्यान, आज पाटण्यामध्ये सर्वांचं लक्ष वेधलं ते राष्ट्रवादी युवक काँग्रेसने लावलेल्या बॅनर्सने. '50 खोके एकदम ओके' असे बॅनर पाटण्यात झळकले आहेत.

Patna Meeting
Big Breaking: ऑगस्ट महिन्यात इथेनॉलवर धावणारी गाडी बाजारात येणार, नितीन गडकरींची मोठी घोषणा

राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून हे बॅनर्स लावल्याचं सांगण्यात येत आहे. विरोधकांची बैठक ज्या ठिकाणी होणार आहे त्या परिसरात लावले बॅनर लावल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

या बैठकीसाठी शरद पवार, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, अरविंद केजरीवाल, भगवंत मान, मल्लिकार्जून खर्गे, राहुल गांधी यांच्यासह देशातील मोठे नेते दाखल झालेले आहे.

Patna Meeting
Devendra Fadnavis : "मोदी हटाव नाही, परिवार बचाओ…"; पाटण्यातील विरोधकांच्या बैठकीवर फडणवीसांचा टोला

दरम्यान, काही वेळापूर्वीच या बैठकीला सुरुवात झालेली आहे. पाटण्यात ज्या भागात बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे तिथेच 'पन्नास खोके एकदम ओके' असे बॅनर झळकले आहेत. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने हे बॅनर्स लावण्यात आलेले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.