Karnataka CM Basavaraj Bommai
Karnataka CM Basavaraj Bommaiesakal

Basavaraj Bommai : सरकारनं ही आंदोलनं थांबवावी अन्यथा..; बसेसवर 'जय महाराष्ट्र' लिहल्यानं बोम्मई चिडले

कर्नाटकच्या बसेसवर 'जय महाराष्ट्र' लिहून काळं फासल्यामुळं मोठा वाद निर्माण झाला आहे.
Published on
Summary

कर्नाटकच्या बसेसवर 'जय महाराष्ट्र' लिहून काळं फासल्यामुळं मोठा वाद निर्माण झाला आहे.

बंगळुरु : महाराष्ट्रात कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या (Karnataka State Transport Corporation) बसेसवर 'जय महाराष्ट्र' असं लिहून काळे फासल्याने कर्नाटक-महाराष्ट्र बसेस (Karnataka-Maharashtra Border Dispute) शुक्रवारी बंद झाल्या. विविध आगाराच्या लांब पल्याच्या बसेस निपाणी व कोल्हापूर इथं थांबवून ठेवल्या आहेत.

Karnataka CM Basavaraj Bommai
MCD Election : काँग्रेसचे माजी आमदार आसिफ खान यांना अटक; भरसभेत पोलिसांना दिली होती धमकी

त्याचा परिणाम दोन्ही राज्य परिवहन महामंडळाच्या बस सेवेवर झाला. या प्रकारामुळं कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Karnataka CM Basavaraj Bommai) चांगलेच संतापले आहेत. वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सर्वोच्च न्यायालयात असताना हा वाद अधुनमधून राजकीय पटलावर येतो. त्यात मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यासह सोलापूर शहर आणि अक्कलकोट तालुक्यावर दावा केला. यानंतर कोल्हापूर (Kolhapur), सांगली, सोलापूर आणि अक्कलकोट भागात बोम्मई यांच्याविरोधात मोठ्या प्रमाणात निदर्शनं करण्यात आली.

Karnataka CM Basavaraj Bommai
धोका वाढला! एक गोवर रुग्ण 18 जणांना करु शकतो संक्रमित; WHO चा महत्वाचा इशारा

तर, काही ठिकाणी कर्नाटकच्या बसेसवर ‘जय महाराष्ट्र’ लिहण्यात आलं. यावरून बोम्मई संतापले आहेत. राज्यात कायदा, सुव्यवस्था राखणं हे संबंधित सरकारचं काम आहे. कोणी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर आंदोलन करत असतील, तर त्याचा मी निषेध करतो. महाराष्ट्र सरकारनं तत्काळ कारवाई करुन हे थांबवण्याची विनंती करतो. अन्यथा यामुळं राज्यांत फूट पडण्याची शक्यता आहे. आम्ही कायद्याचं पालन करणारी लोक आहोत, असं बोम्मईंनी म्हटलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.