BBC Tax Evasion : बीबीसीचा कांगावा उघड; ४० कोटींचा कर चुकवल्याची दिली कबुली - रिपोर्ट

बीबीसीने स्वतःच कर चुकवल्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे.
BBC Tax Evasion
BBC Tax EvasionEsakal
Updated on

काही दिवसांपूर्वीच करचुकवेगिरी केल्याबद्दल ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्परेशनच्या (BBC) भारतातील कार्यालयांवर छापेमारी करण्यात आली होती. यानंतर आता बीबीसीने स्वतःच कर चुकवल्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे.

हिंदुस्तान टाईम्सने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसच्या दोन अधिकाऱ्यांनी याबाबत (CBDT Officials) माहिती दिली. या अधिकाऱ्यांनी आपले नाव जाहीर न करण्याच्या अटीवर ही माहिती दिल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

BBC Tax Evasion
BBC चे अध्यक्ष रिचर्ड शार्प यांनी दिला राजीनामा; बोरिस जॉन्सन यांच्यामुळे आले अडचणीत

डिपार्टमेंटला केला ई-मेल

या अधिकाऱ्यांनी सांगितले, की बीबीसीने सीबीडीटीला ई-मेल करून कर चुकवल्याची कबुली (BBC Tax invasion) दिली आहे. मात्र, असा मेल करण्याऐवजी बीबीसीने कायदेशीर मार्गाने अर्ज करून, चुकवलेला कर आणि दंड भरायला हवा असं मत एका अधिकाऱ्याने व्यक्त केलं.

४० कोटींचा कर चुकवला

बीबीसीने आपल्या ई-मेलमध्ये आपण आयटीआरमध्ये ४० कोटी रुपये कमी नोंदवल्याचे मान्य केले आहे. याचाच अर्थ, बीबीसीने तेवढ्या कोटींची करचुकवेगिरी केली आहे. मात्र, या ईमेलला कोणताही कायदेशीर आधार नाही. बीबीसी (BBC Tax fraud) याबाबत गंभीर असेल तर त्यांनी सुधारित टॅक्स रिटर्न फाईल करावं, असं एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटलं.

BBC Tax Evasion
PM Modi BBC Documentary : मोदींवरील बीबीसी डॉक्युमेंटरीविरोधात विधानसभेत ठराव मंजूर

कारवाई सुरू राहणार

आपल्या देशात कायदा सर्वांसाठी समान आहे. एखाद्या मीडिया कंपनीला किंवा फॉरेन कंपनीला स्पेशल ट्रीटमेंट देण्यात येत नाही. त्यामुळे बीबीसी जोपर्यंत कायदेशीर मार्गाने हे प्रकरण सोडवत नाही, तोपर्यंत त्यांच्याविरोधात कारवाई सुरूच राहणार आहे; असंही या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.

बीबीसीचा कांगावा

बीबीसीने काही दिवसांपूर्वी गुजरात दंगलींवर एक वादग्रस्त डॉक्युमेंटरी (BBC Modi Documentary) प्रसिद्ध केली होती. यानंतर आपल्यावर सूड उगवण्यासाठी प्राप्ती कर विभागाने ही कारवाई केल्याचं सांगत बीबीसीने कांगावा केला होता. मात्र, आता अनौपचारिक पद्धतीने त्यांनी हे कबूल केलं आहे, की त्यांनी करचुकवेगिरी केली होती आणि ही कारवाई योग्यच होती; असं मत एका अधिकाऱ्याने व्यक्त केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.