BBC Documentary: गुजरात दंगलीवरुन थरुरांनी 'सेक्युलर' लोकांवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह! विधानामुळं वाद

थरुर यांनी एका कार्यक्रमात केलेल्या विधानावरुन वाद निर्माण झाला आहे.
shashi tharoor.
shashi tharoor.sakal
Updated on

नवी दिल्ली : काँग्रेस खासदार शशी थरुर यांनी बीबीसीनं PM मोदींवर तयार केलेल्या डॉक्युमेंट्रीवर भाष्य केलं आहे. या डॉक्युमेंट्रीत आलेल्या गुजरात दंगलीच्या संदर्भानं शरुर यांनी सेक्युलर लोकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. त्यांच्या या विधानामुळं वाद निर्माण झाला आहे. (BBC Documentary Shashi Sharur questions secular people over Gujarat riots)

shashi tharoor.
Video: जम्मू-काश्मीरमध्ये राहुल गांधींच्या 'भारत जोडो' यात्रेला मोठी सुरक्षा व्यवस्था

थरुर यांनी म्हटलं की, आपण कधीही लोकांना गुजरात दंगली विसरुन पुढे जाण्यास सांगितलेलं नाही. देशातील धर्मनिरपेक्ष लोकांना गुजरातच्या दंगलीवरुन स्वतः द्वेषपूर्ण वागून काही हाती लागणार नाही. यापूर्वी शरुर यांनी म्हटलं होतं की, आता आपल्याला गुजरात दंगलींना मागे सोडलं पाहिजे. तसेच आजच्या ज्या समस्या आहेत, त्यावर फोकस केला पाहिजे. यावरुन शशी थरुर यांच्यावर सोशल मीडियातून खूपच टीका झाली. यानंतर आता शरुर यांनी आपल्या विधानावर स्पष्टीकरण दिलं आहे.

shashi tharoor.
Adani Group : भारतातल्या सर्वात पॉवरफूल उद्योगपतीशी पंगा घेणारा 'हा' माणूस नेमका कोण?

थरुर यांनी नुकतंच एका कार्यक्रमात म्हटलं होतं की, भारताला आता या त्रासापासून पुढे जायला हवं. लोकांना वाटतं की, या दोन दशक जुन्या प्रकरणाला मागे सोडून द्यायला हवं. सुप्रीम कोर्टानं देखील या प्रकरणात आपला निर्णय दिला आहे. त्यांनी पुढे असंही म्हटलं की, आपण त्या लोकांवर आक्षेप घेत नाही आहोत ज्यांना असं वाटतं की गुजरातच्या दंगलींचं अद्याप पूर्ण सत्य समोर आलेलं नाही. शरुर यांच्या या विधानानंतर त्यांना मोठ्या टीकेला समारं जावं लागलं. यावर आता शरुर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

shashi tharoor.
'ते लोकशाहीला घातक...'; सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्तींनी कायदामंत्र्यांना सुनावलं!

थरुर यांनी स्पष्टीकरण देताना म्हटलं की, लोक माझ्या विचारांवर असहमत असू शकतात पण ४ दशकांच्या जतीय प्रकरणांची दखल आणि दोन दशकांपर्यंत गुजरात दंगलीतील पीडितांसोबत उभं राहताना कोणीही बोट दाखवू शकत नाही. देशातील धर्मनिरपेक्ष लोकांना आता या मुद्द्यावर आता द्वेषपूर्ण वागून काहीही मिळणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.