नेपाळमध्ये 6.4 तीव्रतेचा मोठा भूकंप झाला, ज्याचे धक्के भारताची राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक भागात जाणवले. या विनाशकारी भूकंपात नेपाळमध्ये आतापर्यंत 128 जणांचा मृत्यू झाल्याचं कळतंय. रात्री 70 जणांनी आपले प्राण गमावले होते. आणखी मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान एका महिन्याच्या आत झालेला हा तिसरा भूकंप आहे, काल (शुक्रवारी) नेपाळमध्ये ६.४ तीव्रतेचा तीव्र भूकंप झाला, दिल्ली-एनसीआर, उत्तर प्रदेश आणि बिहारसह संपूर्ण उत्तर भारतात या भूकंपाचे जोरदार हादरे जाणवले. नेपाळमधील मध्यवर्ती पट्टा "सक्रियपणे ऊर्जा सोडणारे क्षेत्र" म्हणून ओळखले जात असल्याने लोकांनी सतर्क राहावे, असा इशारा भूकंपशास्त्रज्ञाने दिला आहे.
वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन जिऑलॉजी येथे काम केलेले भूकंपशास्त्रज्ञ अजय पॉल यांनी सांगितले की, शुक्रवारी भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळच्या डोटी जिल्ह्याच्या जवळ होता. नोव्हेंबर २०२२ मध्ये जिल्ह्यात ६.३ रिश्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का बसला आणि त्यात सहा जणांचा मृत्यू झाला.
3 ऑक्टोबर रोजी नेपाळमध्ये एकापाठोपाठ आलेल्या भूकंपांची मालिकाही याच भागाच्या आसपास असल्याचे त्यांनी सांगितले. जरी पश्चिमेकडे थोडेसे असले तरी ते नेपाळच्या मध्यवर्ती पट्ट्यात आहेत, असे पॉल म्हणाले. त्याचबरोबर त्यांनी लोकांनी सतर्क आणि दक्ष राहणे आवश्यक आहे, असे त्यांनी म्हटलं आहे.
अनेक शास्त्रज्ञांनी असा अंदाज वर्तवला आहे की, हिमालयाच्या प्रदेशात ‘केव्हाही’ मोठा भूकंप येईल कारण भारतीय टेक्टोनिक प्लेट उत्तरेकडे जात असताना युरेशियन प्लेटशी संघर्ष करत आहे. अंदाजे ४०-५० दशलक्ष वर्षांपूर्वी जेव्हा भारतीय प्लेट हिंद महासागरातून उत्तरेकडे सरकली तेव्हा युरेशियन प्लेटशी आदळली तेव्हा हिमालयाची निर्मिती झाली.
शास्त्रज्ञांच्या मते, भारतीय प्लेट उत्तरेकडे कूच करत असल्याने हिमालयाच्या खाली दबाव वाढत आहे, ज्यामुळे युरेशियन प्लेटशी संघर्ष निर्माण होत आहे. हिमालयावरील दाब एका किंवा अनेक मोठ्या भूकंपांच्या माध्यमातून सोडला जाण्याची शक्यता आहे, रिश्टर स्केलवर आठ पेक्षा जास्त मोजले जाईल.
मात्र, एवढा मोठा भूकंप नेमका केव्हा होईल हे अचूकपणे सांगता येत नाही, असेही शास्त्रज्ञांनी नमूद केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.