Mallikarjun Kharge: शेतकरी कुटुंबात जन्म ते भारताच्या सर्वात जुन्या पक्षाचे अध्यक्ष; जाणून घ्या खर्गेंचा राजकीय प्रवास

शशी थरुर यांना मात देत मोठ्या मताधिक्क्यानं मल्लिकार्जुन खर्गे काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवडून आले आहेत.
Congress President Election Candidate Mallikarjun Kharge
Congress President Election Candidate Mallikarjun Khargeesakal
Updated on

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. शशी थरुर यांना मोठ्या फरकानं मात देत मोठ्या मताधिक्यानं खर्गे निवडून आले आहेत. खर्गेंच्या निवडीमुळं काँग्रेसमधील २४ वर्षांच्या घराणेशाहीचाही अंत झाल्याची भावना विविध स्तरातून व्यक्त होत आहे. काँग्रेसचे नवे हायकमांड बनलेल्या खर्गेंचा राजकीय जीवनप्रवास जाणून घेऊयात. (Born in farmers family to President of India grand old Congress Party Know political journey of Mallikarjun Kharge)

Congress President Election Candidate Mallikarjun Kharge
ShivSena: बाळासाहेबांपेक्षा उद्धव ठाकरेंनी शिवसेना दोन पावलं पुढे नेली - भास्कर जाधव

मल्लिकार्जुन खर्गेंचा जन्म कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातील वारावत्ती भागात एका शेतकरी कुटुंबात झाला. गुलबर्गा इथल्या नूतन विद्यालयातून त्यांनी शालेय शिक्षण घेतलं. त्यानंतर इथल्याचं सरकारी महाविद्यालयातून त्यांनी पदवीची डिग्री मिळवली. या महाविद्यालयात ते विद्यार्थी संघटनेचे सरचिटणीस होते. गुलबर्गामधील शेठ शंकरलाल लाहोटी लॉ कॉलेजमधून त्यांनी एलएलबीची डिग्री घेतली आणि त्यांनी वकिलीचा व्यवसाय सुरु केला.

Congress President Election Candidate Mallikarjun Kharge
Pune Rain : पावसाच्या पाण्यात उतरुन सुषमा अंधारेंचं मदतकार्य? फोटोमागचं सत्य जाणून घ्या...

सन १९६९ मध्ये एमकेएस मिल्स कर्मचारी संघाचे ते सल्लागार बनले. त्यावेळी त्यांनी कामगारांच्या हक्कांसाठी मोठी लढाई लढली. नंतर संयुक्त कामगार संघाचे ते प्रभावशाली नेते राहिले. यावर्षीच ते काँग्रेस पक्षाचे सदस्य बनले. पक्षानं त्यांची लोकप्रियता पाहता त्यांना गुलबर्गा काँग्रेस कमिटीचं अध्यक्ष बनवलं. सन १९७२ मध्ये पहिल्यांदा कर्नाटकच्या गुरमीतकल विधानसभा मतदारसंघातून ते आमदार बनले. खर्गे गुरमीतकल जागेवरुन नऊ वेळा आमदार म्हणून निवडून आले. या दरम्यान त्यांनी विविध विभागात मंत्रिपद सांभाळलं. सन २००५ मध्ये त्यांनी कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बनवण्यात आलं, २००८ पर्यंत ते या पदावर राहिले. त्यानंतर सन २००९ मध्ये ते पहिल्यांदा खासदार बनले.

Congress President Election Candidate Mallikarjun Kharge
Uddhav Thackeray : 'मशाल' ठाकरेंचीच! समता पक्षाची याचिका हायकोर्टानं फेटाळली

मल्लिकार्जुन खर्गे गांधी कुटुंबियांचे विश्वासू मानले जातात. याचं वेळोवेळी त्यांनी बक्षीसही मिळालं आहे. सन २०१४ मध्ये खर्गेंना लोकसभेत पक्ष नेता बनवण्यात आलं. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पराभवानंतर काँग्रेसनं त्यांना २०२० मध्ये राज्यसभेवर पाठवलं. गेल्यावर्षी गुलाम नबी आझाद यांचा कार्यकाळ संपल्यानंतर खर्गे यांना राज्यसभेत विरोधीपक्ष नेतेपद देण्यात आलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.