Modi Government: शपथविधीपूर्वी अमित शाह यांच्या घरी रात्री उशिरा खलबतं, कॅबिनेट मंत्र्यांच्या नावांवर चर्चा?

Modi Government: मोदी सरकारचा शपथविधी सोहळा आज संध्याकाळी 7.15 वाजता होणार आहे. याआधी अमित शाह यांच्या निवासस्थानी मोठी बैठक बोलावण्यात आली होती.
Modi Government
Modi GovernmentEsakal

मोदी सरकारचा शपथविधी सोहळा आज संध्याकाळी 7.15 वाजता होणार आहे. याआधी अमित शाह यांच्या निवासस्थानी मोठी बैठक बोलावण्यात आली होती. या महत्त्वाच्या बैठकीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह बीएल संतोषही सहभागी झाले होते. बैठकीत कॅबिनेट मंत्र्यांच्या नावांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. याआधी शनिवारी संध्याकाळी अमित शहा, जेपी नड्डा आणि बीएल संतोष यांनीही नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन कॅबिनेट मंत्र्यांच्या नावांवर चर्चा केली होती.

अमित शाह यांच्या घरी बैठक होण्यापूर्वी ७ जून रोजी जेपी नड्डा यांच्या घरी एनडीए नेत्यांची तब्बल ४ तास मॅरेथॉन बैठक झाल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी सर्वांना विचारण्यात आले की, तुम्हाला किती मंत्रीपदे आणि कोणते विभाग हवे आहेत. यानंतर आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देऊ, असे सांगण्यात आले. नड्डा यांच्या घरी झालेल्या बैठकीत जेडीएस नेते एचडी कुमारस्वामी म्हणाले की, त्यांना कृषी मंत्रालय हवे आहे. चंद्राबाबू नायडू यांना पायाभूत सुविधांशी संबंधित मंत्रिपद त्यांच्याकडे द्यावे अशी त्यांची इच्छा असल्याचेही बोलले जात आहे. याबाबतचे वृत्त आज तक या हिंदी वृत्तवाहिनीने दिले आहे.

Modi Government
Indian Foreign Policy : राजकीय बदलाचा परराष्ट्र धोरणावर परिणाम नाही;आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचे मत,मोदींचा करिष्मा कमी होण्याची शक्यता

दुसरीकडे, नितीश कुमार यांना मंत्रिमंडळात तीन स्थान हवे आहेत, असे म्हटले जात असले तरी पक्षाच्या नेत्यांशी कोणती मंत्रिपदे असतील याबाबत त्यांची चर्चा सुरू आहे. जयंत चौधरी आणि जितनराम मांझी यांनाही बोलावून त्यांच्या इच्छा विचारण्यात आल्या. अशा स्थितीत भाजपपुढे प्रश्न असा आहे की, जर त्यांनी मित्रपक्षांना इतके मंत्रिमंडळ दिले असेल, तर या निवडणुकीत निवडून आलेल्या भाजपच्या खासदारांची काय मिळणार?

Modi Government
Narendra Modi : ‘टीम मोदी’ची उत्सुकता!,आज ‘एनडीए’चे सत्तारोहण; शेजारील देशांचे अध्यक्ष, पंतप्रधान उपस्थित राहणार

एनडीएच्या घटक पक्षांशी भाजपच्या दिग्गज नेत्यांची चर्चा सुरू

मोदी सरकार 3.0 मध्ये एनडीएच्या विविध घटकांच्या सहभागाबाबत भाजप नेतृत्व आणि त्यांच्या मित्रपक्षांमध्ये चर्चा सुरू आहे. अमित शाह आणि राजनाथ सिंह यांसारख्या वरिष्ठ भाजप नेत्यांव्यतिरिक्त पक्षाध्यक्ष जेपी नड्डा तेलगू देसम पक्षाचे चंद्राबाबू नायडू, जेडीयूचे नितीश कुमार आणि शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्यासह इतर मित्रपक्षांशी सतत चर्चा करत आहेत.

शिक्षण आणि संस्कृती व्यतिरिक्त गृह, अर्थ, संरक्षण आणि परराष्ट्र अशी महत्त्वाची मंत्रालये भाजपकडे राहतील, तर मित्रपक्षांना ५ ते ८ मंत्रिमंडळ मिळू शकेल, अशी शक्यता आहे. यासोबतच अमित शाह आणि राजनाथ सिंह यांसारखे नेते नव्या मंत्रिमंडळात सामील होणे निश्चित मानले जात असताना, शिवराज सिंह चौहान, बसवराज बोम्मई, मनोहर लाल खट्टर आणि सर्बानंद सोनोवाल यांसारखे लोकसभा निवडणुकीत विजयी झालेले माजी मुख्यमंत्री सरकारमध्ये सामील होण्याची शक्यता आहे. ते प्रबळ दावेदार आहेत.

जेडीयू-भाजपमध्ये कॅबिनेट फॉर्म्युला तयार

मिळालेल्या माहितीनुसार, बिहार सरकारमध्ये कॅबिनेट फॉर्म्युल्याच्या धर्तीवर केंद्रात मंत्री केले जाणार आहेत, म्हणजेच जितके खासदार भाजपचे मंत्री होतील, तितकेच खासदार जेडीयूचे मंत्री होतील. जेडीयू आणि भाजपच्या वेगवेगळ्या जातीय समीकरणांनुसार मंत्री केले जातील.

Modi Government
Narendra Modi: विरोधकांना मोदींच्या शपथविधीचं निमंत्रणच नाही; जयराम रमेश म्हणतात, एक तृतीयांश पंतप्रधान...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com