चंदीगढ : पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग (Captain Amrindar Singh) यांनी 2022 च्या पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसशी (Congress) फारकत घेऊन नवा पक्ष स्थापन केला होता. अमरिंदर सिंग यांच्या पक्षाचे नाव 'पंजाब लोक काँग्रेस' (PLC) असे असून, लवकरच हा पक्ष भाजपमध्ये (BJP) विलीन होणार आहे. PLC चे भाजपमध्ये विलीनीकरण झाल्यानंतर भाजपकडून कॅप्टन अमरिंदर सिंह यांना पंजाबमध्ये मोठी जबाबदारी देऊ शकते अशी माहिती सूत्रांकडून सांगितली जात आहे. (Captain Amrindar Singh News)
एवढेच नव्हे तर, 2024 च्या लोकसभा निवडणुका आणि त्यानंतरच्या पंजाब विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपकडून कॅप्टन अमरिंदर सिंह यांना प्रमुख चेहरा म्हणून समोर करून लोकसभेच्या 13 आणि विधानसभेच्या सर्वच्या सर्व 117 जागांवर स्वबळावर उतरणार असल्याचे सांगितले जात आहे.
कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी काँग्रेस सोडल्यानंतर स्वतंत्र पक्ष पीएलसीची स्थापन केली होती, परंतु 2022 च्या पंजाब विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला हवे तसे यश संपादन करता आले नाही. विशेष म्हणजे या निवडणुकीतही सिंह यांनी भाजपशी युती करून निवडणूक लढवली होती. मात्र, यामध्ये पीएलसीला एकही जागा जिंकता आली नव्हती. विशेष म्हणजे कॅप्टन स्वतः पतियाळामधून निवडणूक पराभूत झाले होते.
काँग्रेसचे अनेक नेते सहभागी होतील
दरम्यान, पीएलसी पक्षाची स्थापना केल्यानंतर अमरिंदर सिंह यांनी राज्यातील अनेक काँग्रेस नेते त्यांच्या पक्षात सामील होतील, असा दावा केला होता. परंतु असे न होता काँग्रेस सोडलेले सर्व नेत्यांनी पीएलसीऐवजी भाजपमध्ये प्रवेश करण्यास सुरुवात केली. यामध्ये राणा गुरमीत सिंग सोधी आणि फतेहजंग बाजवा यांच्या नावांचा समावेश आहे. विधानसभा निवडणुकीनंतरही हा ट्रेंड कायम होता. यावेळी सुनील जाखर, राजकुमार वेरका, बलबीर सिद्धू, सुंदर शाम अरोरा, गुरप्रीत सिंग कांगार, केवलसिंग ढिल्लन यांसारख्या दिग्गज काँग्रेस नेत्यांनी कॅप्टनच्या पीएलसीऐवजी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.