धक्कादायक! भीक म्हणून ५ रुपये दिल्याने भिकारी संतापला, रागात चाकू काढला अन्... परिसरात खळबळ

Crime News: एका व्यक्तीला भिकाऱ्याला सल्ला देणे महागात पडले. भिकाऱ्याने त्या व्यक्तीवर चाकूने हल्ला करून जखमी केले. पोटात चाकूने जखमी झालेल्या व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Crime
CrimeEsakal
Updated on

UP News: उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये भिकाऱ्याने भीक न मिळाल्याने एका व्यक्तीवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बिजनौरच्या नई बस्तीमध्ये एका भिकाऱ्याने एका व्यक्तीकडे भीक मागितली, पण त्याने भीक दिली नाही. यावर भिकाऱ्याने त्या व्यक्तीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. याला त्या व्यक्तीने विरोध केला असता भिकाऱ्याने त्याच्यावर चाकूने हल्ला केला. या घटनेनं खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.