Women Beggar Arrested: बापरे! भिकाऱ्यानं ४५ दिवसांत कमावले तब्बल अडीच लाख रुपये; मुलांना जबरदस्तीनं भीक मागायला लावल्यानं अटक

Women Beggar Arrested: भिक मागणाऱ्या विरोधात चालवलेल्या एका मोहिमेत मध्य प्रदेशातील प्रशासनाने भीक मागून अडीच लाख रुपये गोळा करणाऱ्या एका महिलेला अटक केली.
Women Beggar Arrested
Women Beggar ArrestedEsakal
Updated on

एका भीक मागणाऱ्या कुटुंबाने ४५ दिवसांत तब्बल अडीच लाख रुपये कमावल्याची माहिती समोर आली आहे. इंदूरमध्ये इंद्राबाई या महिलेने आपल्या मुलांना जबरदस्तीनं भीक मागायला लावले होते, अशी माहिती तिला ताब्यात घेतल्यानंतर अधिकाऱ्यांनी सांगितले. इंद्राबाई या महिलेने तिच्या मुलांना जबरदस्तीने गुन्ह्यात आणल्या विरोधात तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आणि काल(सोमवारी) तिची कोठडीत रवानगी करण्यात आली. तिच्या एका मुलीला एनजीओमध्ये ठेवण्यात आले आहे.(Latest Marathi News)

“उपाशी राहण्यापेक्षा आम्ही भीक मागणे पसंत केले. चोरी करण्यापेक्षा हे चांगले आहे, असं तिने यावेळी म्हटलं आहे.

Women Beggar Arrested
Sarojini Naidu Birth Anniversary : कोण होत्या भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल? जन्मदिनी साजरा होतो 'राष्ट्रीय महिला दिन'

भिकाऱ्यांचे पुनर्वसन करण्यासाठी इंदूर महानगरपालिकेसोबत काम करणारी स्वयंसेवी संस्था इंदूरच्या 38 प्रमुख चौकांमधून सुमारे 7,000 भिकाऱ्यांची माहिती गोळा करत आहे, त्यापैकी 50% मुले आहेत. एनजीओ स्वयंसेविका रुपाली जैन यांनी TOI शी बोलताना सांगितले की, "एक अंदाजानुसार एकत्रितपणे ते वार्षिक 20 कोटींहून अधिक कमावतात." (Marathi Tajya Batmya)

सात वर्षांच्या मुलाशिवाय, इंद्राला 10, 8, 3 आणि 2 वर्षे वयोगटातील इतर चार मुले आहेत. ती मोठ्या मुलांना इंदूरच्या रहदारी असणाऱ्या भागात भीक मागायला सांगते, तेथून उज्जैन, महाकालकडे रस्ते जातात. तिने पुढे पोलिसांना सांगितले की तिने क्रॉसिंग निवडले कारण ते उज्जैनसाठी ट्रान्झिट पॉईंट होते. प्रार्थना करण्यासाठी जात असलेल्या यात्रेकरूंना भिक्षा मागणाऱ्या मुलांना आणि महिलांना दूर पळवून लावण्याची शक्यता नव्हती. महाकाल लोकच्या निर्मितीनंतर तिची कमाई वाढल्याचे तिने सांगितले.

Women Beggar Arrested
Teacher dismissed: प्रभू रामाला काल्पनिक पात्र म्हणणे शिक्षिकेला पडलं महागात; शाळेतून हकालपट्टी

महाकाल लोक तयार होण्यापूर्वी दररोज सुमारे 2,500 भाविकांची संख्या होती, आणि आता ती दिवसाला 1.75 लाख आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.(Latest Marathi News)

9 फेब्रुवारी रोजी इंद्राबाई तिच्या मुलीसोबत भीक मागताना पकडण्यात आल्याने तिची पैसे मिळवण्याची धावपळ कमी झाली. तिचा नवरा आणि दोन मोठी मुले पळून गेली. अधिकाऱ्यांना तिच्याकडे 19,600 रुपये आणि मुलीकडे 600 रुपये सापडले. इंद्राने अटकेच्या ४५ दिवसांत अडीच लाख रुपये कमावल्याचे उघड झाले. तिने असेही सांगितले की, तिच्याकडे राजस्थानमधील कोटाजवळ एक दोन मजली घर आणि शेतजमीन आहे, ते चांगला स्मार्टफोन वापरतात. तर, तिचा नवरा मोटारसायकलवरून फिरतो. सर्व काही भीक मागून कमावल्याचे तिने सांगितले आहे. (Marathi Tajya Batmya)

इंद्राकडे राजस्थानच्या कोटाजवळ दोन मजली घर आणि जमीन आहे, ती चांगला स्मार्टफोन वापरते आणि तिचा नवरा मोटरसायकलवरून फिरतो.

Women Beggar Arrested
Sharad Pawar: शरद पवार गटाची सुप्रीम कोर्टात धाव; निवडणूक आयोगाच्या निकालाला दिलं आव्हान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.