Karnatak Rain: चिक्कोडी विभागात गतवर्षी पावसाने दडी मारल्याने मोठे संकट उभे राहिले होते. शेतीसह पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे उन्हाळ्यात नदीकाठावरील भागातही ऊस लावणी करू नये, असे आवाहन करण्यात आले होते.
यंदा पावसाने चांगली हजेरी लावली आहे. नदीकाठावर काही नुकसान झाले असले तरी पावसाने सरासरी ओलांडल्याने पाणीटंचाई दूर झाली आहे.
चिक्कोडी विभागात निपाणी वगळता इतर पावसाचे प्रमाण कमी असते. त्यानुसार कमीतकमी पावसाचा अंदाज धरलेला असतो. यावेळी चिक्कोडी विभागातील निपाणी, चिक्कोडी, रायबाग, अथणी, कागवाड तालुक्यात पावसाने चांगली हजेरी लावल्याने नद्या, तलाव, कूपनलिकांना भरपूर पाणी आहे.
सध्या पाणीटंचाई दूर झाली आहे. नदीकाठांवरील प्रदेशात काहीसे नुकसान झाले आहे. पण, महाराष्ट्रातील धरणे भरल्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यातील पाण्याची टंचाई चिक्कोडी भागापुरती का असेना दूर झाल्याची स्थिती आहे.
चिक्कोडी विभागातील सर्व तलाव पाण्याने तुडूंब भरले आहेत. त्यामुळे त्याचा उपयोग माळभागातील जमिनींसाठी झाला आहे. नाले, ओढे भरून राहिल्याने कूपनलिकांची पातळी वाढणार आहे. त्यामुळे यंदा चिक्कोडी भागाला पावसाने चांगला दिलासा दिला आहे. जूनमध्ये पाचही तालुक्यात अपेक्षेपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.
जूनमध्ये अधूनमधून झालेल्या पावसाची सरासरी इतर तालुक्यांत चांगली आहे. जुलैमधील पावसाची सरासरी चिक्कोडी व निपाणी तालुक्यात अधिक आहे. निपाणी तालुक्यात जुलैमध्ये अपेक्षेपेक्षा १६६ मिलिमीटर अधिक पाऊस झाला आहे. यावर्षी निपाणीत दमदार पाऊस झाला आहे. तर चिक्कोडी तालुक्यातही ८० मिलिमीटर पाऊस अपेक्षेपेक्षा अधिक झाला आहे.
चिक्कोडी व निपाणी तालुक्यात लहान व मोठे असे सुमारे ४० तलाव असून सर्व तलाव यावर्षीच्या पावसाने भरले आहेत. केवळ जोडकुरळी येथील तलावात पाणी कमी आहे. उर्वरित ठिकाणी तलाव पूर्ण भरले आहेत. त्यामुळे त्या भागातील शेतीसाठी व कूपनलिकांसाठी हे फायदेशीर ठरले आहे.
तालुका अपेक्षित पाऊस झालेला पाऊस
अथणी ८१ १२०
चिक्कोडी ९८ १५८
रायबाग ७४ ११४
निपाणी १५९ १७०
कागवाड १०२ १९१
तालुका अपेक्षित पाऊस झालेला पाऊस
अथणी ५४ ७९
चिक्कोडी १२६ २०६
रायबाग ६७ ११०
निपाणी २०१ ३६७
कागवाड ६८ १४७
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.