Belgaum Black Day : कोगनोळी टोल नाक्याजवळ विजय देवणेंसह शिवसेना पदाधिकाऱ्यांना रोखले; कर्नाटक पोलिस-नेत्यांमध्ये बाचाबाची

पोलिसांनी रोखून धरल्याच्या निषेधार्थ ठिय्या आंदोलन करण्यात आले.
Black Day Karnataka Police
Black Day Karnataka Policeesakal
Updated on
Summary

कर्नाटक राज्यामध्ये जाऊ दिले जात नसल्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महामार्गावरच ठिय्या आंदोलन सुरू केले.

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समिती (Maharashtra Ekikaran Samiti Belgaum) आणि मराठी भाषिकांतर्फे बेळगावला आज (ता. १) आयोजित काळा दिन फेरीत सहभागी होण्यासाठी येणाऱ्या शिवसेना नेते विजय देवणे आणि कार्यकर्ते यांना महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर कोगनोळी टोल नाक्याजवळ रोखण्यात आले.

Black Day Karnataka Police
Maratha Reservation : 'महाराष्ट्र मराठ्यांचा आहे, न्याय हक्काच्या लढाईत आवाज दडपू देणार नाही'; शिवेंद्रराजेंची रोखठोक भूमिका

यावेळी पोलीस व शिवसेना पदाधिकारी यांच्यामध्ये बाचाबाची झाली. पोलिसांनी रोखून धरल्याच्या निषेधार्थ ठिय्या आंदोलन करण्यात आले. बेळगावसह सीमाभागामध्ये मराठी भाषेवर अन्याय झाल्यानंतर त्याची ठिणगी शेजारी महाराष्ट्र राज्यात उमटते. खासकरून कोल्हापूर येथे या विरोधात निदर्शने केली जातात.

Black Day Karnataka Police
Belgaum Black Day : 'बेळगाव, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे'; सीमाभागात मराठी भाषिकांचा एल्गार

आज काळादिन फेरीत सहभागी होण्यासाठी हजारो कार्यकर्ते येण्याची शक्यता होती. त्यासाठी कर्नाटक पोलिसांनी (Karnataka Police) चेक पोस्ट उभारले आहेत. कोगनोळी टोलनाकामार्गे (Kognoli Toll Plaza) आत येताना पोलिसांनी अडविले आणि ताब्यात घेऊन महाराष्ट्र पोलिसांकडे सुपूर्द केले आहे.

Black Day Karnataka Police
Black Day Karnataka Policeesakal

यावेळी कर्नाटक राज्यामध्ये जाऊ दिले जात नसल्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महामार्गावरच ठिय्या आंदोलन सुरू केले. यामुळे या ठिकाणी काहीकाळ तणावपूर्ण वातावरण बनले होते. यावेळी 'रहेंगे तो महाराष्ट्र मे, नही तो जेल मे,' बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर भालकीचा संयुक्त महाराज झालाच पाहिजे, कर्नाटक मुख्यमंत्र्यांचा निषेध स्वरूपाच्या घोषणा, या संदर्भात देऊन लक्ष वेधून घेतले.

Black Day Karnataka Police
Maratha Reservation साठी कोकणातून पहिला राजीनामा; काँग्रेसच्या 'या' नेत्यानं पक्षाला दिली सोडचिठ्ठी

शिवसेना कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. दरम्यान, महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते येण्याची शक्यता असल्यामुळे कर्नाटक पोलिसांनी १४ चेक पोस्ट उभारले असून त्या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, त्याचाच भाग म्हणून पोलिसांनी यादरम्यान कारवाई करून कार्यकर्त्यांना रोखून धरले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()