Loksabha Election : लोकसभा निवडणुकीची मार्चमध्ये घोषणा? उमेदवारीसाठी राष्ट्रीय पक्षांकडून गतिमान हालचाली

विधानसभा निवडणुकीनंतर आता लोकसभा निवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे.
Belgaum Loksabha Election Politics
Belgaum Loksabha Election Politicsesakal
Updated on
Summary

चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातून अण्णासाहेब जोल्ले यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.

बेळगाव : लोकसभा निवडणूक (Belgaum Loksabha Election) फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये घोषित होण्याची शक्यता आहे. त्यासाठी राष्ट्रीय पक्षांनी म्हणजे भाजप आणि कॉंग्रेसकडून (BJP and Congress) उमेदवारीची चाचपणी सुरू आहे. शिवाय काहींनी मोर्चेबांधणी करत उमेदवारी गळ्यात पाडून घेण्याची तयारी सुरू केली आहे. विशेष म्हणजे, यात निवृत्त सनदी अधिकाऱ्यांची नावे चर्चेत आहे.

Belgaum Loksabha Election Politics
Maratha Reservation चा वेळीच निर्णय घ्या, अन्यथा स्फोट झाल्याशिवाय राहणार नाही; आमदार शिंदेंचा स्पष्ट इशारा

विधानसभा निवडणुकीनंतर आता लोकसभा निवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे. उमेदवारांच्या चाचपणीला वेग आला आहे. राष्ट्रीय, प्रादेशिक आणि स्थानिक संघटना पातळीवर त्याची चर्चाही सुरू आहे. यासाठी विविध जणांची नावे चर्चेत आहेत. त्यात कॉँग्रेसमध्ये पालकमंत्री सतीश जारकीहोळी (Satish Jarkiholi) यांच्या खांद्यावर लोकसभेची जबाबदारी असणार आहे.

Belgaum Loksabha Election Politics
Maharashtra Politics : चार वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या पवारांनी राज्यासाठी काय केलं? राजन तेलींचा सुप्रिया सुळेंना सवाल

भाजपमध्ये यादी अंतिम ठरविताना प्रभाकर कोरे, भालचंद्र जारकीहोळी, अभय पाटील, इराण्णा कडाडी आणि रमेश जारकीहोळी यांचा अभिप्राय घेतला जाणार आहे. त्यात सध्या तरी महांतेश कवटगीमठ यांचे नाव आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ रमेश कत्ती, ॲड. अनिल बेनके, निवृत्त सनदी अधिकारी एम. जी. हिरेमठ यांची नावे चर्चेमध्ये आहेत.

चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातून अण्णासाहेब जोल्ले यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. तर कॉँग्रेसमध्ये बेळगावातून साधूण्णावर, मृणाल हेब्बाळकर, प्रियंका जारकीहोळी, राजेंद्र सन्नक्की यांची नावे चर्चेत आहेत. एकंदरीत उमेदवारी अंतिम ठरविण्याची जबाबदारी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या खांद्यावर असणार आहे. भाजपतील इच्छुक यादीमध्ये विशेष म्हणजे निवृत्त सनदी अधिकारी हिरेमठ यांचे नाव चर्चेत आहे. काही मठाधीशांशी त्यांनी चर्चाही केली आहे; पण सध्या तरी कवठगीमठ यांचे नाव चर्चेत आहे.

Belgaum Loksabha Election Politics
Black Day Belgaum : काळ्यादिनी एकवटणार हजारो मराठी भाषिक; महाराष्ट्रात जाण्यासाठी सुरु आहे सीमावासियांचा लढा!

प्रशासकीय पातळीवर हालचालींना वेग

लोकसभा निवडणुकीची तयारी प्रशासकीय पातळीवर सुरू आहे. मतदारयादी, मतदान केंद्रांची तयारी आणि मनुष्यबळाचे नियोजनही सुरू आहे. त्यामुळे राजकीय पक्षांच्या पातळीवर तयारीला वेग आला असून, संघटनेला बळकटी दिली जात आहे. त्याला जोडून संभाव्य उमेदवारांची चाचपणी पक्षीय पातळीवर सुरू आहे. यादरम्यान विविध नेत्यांसह माजी आमदारांची नावे चर्चेत पुढे येत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.