Same-Sex Marriage : समलिंगी विवाहाला मान्यता मिळणार का? CJI चंद्रचूड यांच्या अध्यक्षेतेखाली खंडपीठ!

Same-Sex Marriage
Same-Sex Marriage
Updated on

नवी दिल्ली: समलिंगी विवाहाला मान्यता मिळावी या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हे प्रकरण घटनात्मक खंडपीठाकडे पाठवले आहे. दरम्यान आज पाच सदस्यांचे खंडपीठ नेमण्यात आले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, ही मूलभूत आणि मूलभूत महत्त्वाची बाब आहे, त्यामुळे हे प्रकरण सुनावणीसाठी आणि त्यावर निर्णय घेण्यासाठी मोठ्या खंडपीठाकडे पाठवले जाते. दरम्यान खंडपीठातील पाच सदस्यांची नावे जाहीर करण्यात आले आहेत.

सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सांगितले की, या प्रकरणात एकीकडे घटनात्मक अधिकारांचा मुद्दा आहे. तर दुसरीकडे विशेष विवाह कायद्यासह इतर कायदे आहेत, ज्यांचा एकमेकांवर परिणाम होतो.

उपस्थित केलेल्या मुद्द्यांमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने या प्रकरणाकडे लक्ष देणे योग्य ठरेल आणि अशा परिस्थितीत हे प्रकरण घटनापीठाकडे पाठवणे योग्य ठरेल, असे आमचे मत आहे.

Same-Sex Marriage
Pulwama Attack : मलिकांच्या आरोपाप्रमाणे पुलवामा हल्ल्याकडे दुर्लक्ष झालं का? मोदी तेव्हा काय करत होते?

सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की या प्रकरणाची सुनावणी १८ एप्रिलपासून होईल आणि पाच न्यायाधीशांचे घटनापीठ त्यावर सुनावणी करेल आणि सुनावणी थेट प्रक्षेपित केली जाईल. विशेष म्हणजे घटनापीठाशी संबंधित प्रकरणाचे थेट प्रक्षेपण होत आहे.

या प्रकरणी पाच न्यायाधिशांचे खंडपीठ नेमण्यात आले आहे. यामध्ये सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती संजय किशन कौल, न्यायमूर्ती रवींद्र भट, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पीएस नरसिम्हा हे असतील.

Same-Sex Marriage
"ना खाऊंगा, ना खाने दुंगा म्हणाणाऱ्या मोदींचा खरा चेहरा उघड"; पटोलेंनी केली 'ही' मागणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.