VIDEO : बंगळुरात बस डेपोला भीषण आग; 18 बस जळून खाक, आकाशात दूरवर पसरले धुराचे लोट

बसच्या टायरला आग लागल्याने काही किलोमीटर दूर आकाशात धुराचे लोट पसरले.
Bangalore Karnataka Police
Bangalore Karnataka Police esakal
Updated on
Summary

या आगीत १८ बसेस पूर्णपणे खाक झाल्या तर १० अन्य बस सुरक्षित राहिल्या.

बंगळूर : दक्षिण बंगळूरमधील (South Bangalore) वीरभद्रनगर येथील बसच्या वर्कशॉपमध्ये सोमवारी लागलेल्या भीषण आगीत विविध खासगी कंपन्यांच्या किमान १८ बस (ST Bus) पूर्णपणे जळून खाक झाल्या. एसव्ही कोच वर्क्स या बस बॉडीबिल्डिंग वर्कशॉपला आग लागली.

Bangalore Karnataka Police
काँग्रेस सरकार धोक्यात? गृहमंत्र्यांच्या स्नेहभोजनाला उपमुख्यमंत्र्यांची दांडी; मुख्यमंत्र्यांच्या हजेरीने राजकीय चर्चांना उधाण

बसच्या टायरला आग लागल्याने काही किलोमीटर दूर आकाशात धुराचे लोट पसरले. हे वर्कशॉप श्रीनिवास यांच्या मालकीचे होते, तो सध्या फरार आहे, असे पोलिस सूत्रांनी सांगितले. प्रत्यक्षदर्शींनी नमूद केले की, आऊटर रिंगरोडपासून दूर असलेल्या पीईएस विद्यापीठाजवळ (PES University) असलेल्या कार्यशाळेत सकाळी साडेअकराच्या सुमारास आग लागली.

Bangalore Karnataka Police
CM Siddaramaiah : मोदी सरकारकडून कर्नाटकाला सापत्नभावाची वागणूक; मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचा आरोप

या आगीत १८ बसेस पूर्णपणे खाक झाल्या तर १० अन्य बस सुरक्षित राहिल्या. वर्कशॉपच्या आत सुरू असलेल्या वेल्डिंगवेळी ही आग लागल्याचा अंदाज आहे, असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. अग्निशमन नियंत्रण कक्षाला सकाळी ११.४५ वाजता कॉल आल्यानंतर ८० ते १०० अग्निशमन दलासह सात अग्निशमन दल घटनास्थळी पोचले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.