Crime News: लिव्ह ईन पार्टनरच्या डोक्यात घातला कूकर; अफेअरच्या संशयातून हत्या

bengaluru crime
bengaluru crime
Updated on

बेंगळुरु- लिव्ह इन पार्टनरला प्रेशर कूकरने मारुन ठार केल्याप्रकरणी एका २९ वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे. बेंगळुरुमधील ही घटना असून शनिवारी पाच वाजता हा प्रकार घडला. वैष्णव आणि देवी (२४) दोघे बंगळुरुच्या एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होते. देवीचे इतर पुरुषाशी संबंध असून ती त्याला धोका देत आहे, असा वैष्णव याला संशय होता. या संशयातून त्या दोघांमध्ये अनेकदा भांडण व्हायचे. (Bengaluru Man Kills Live In Partner With Pressure Cooker Suspecting Affair )

पोलिसांच्या माहितीनुसार, दोन्ही जोडपे केरळचे राहणारे आहेत. ते गेल्या दोन वर्षांपासून बंगळुरुमध्ये राहात होते. वैष्णव आणि देवी एकमेकांना कॉलेजपासून ओळखायचे. ते दोघेही बंगळुरुतील कोरामंगल येथील सेल्स अँड मार्केटिंग कंपनीत काम करतात. एनएनआयने यासंदर्भातील माहिती दिली आहे.

bengaluru crime
Badnapur Crime : जवसगाव शिवारात युवकाचा खून; चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

माहितीनुसार, शनिवारी दोघांच्यात कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर वैष्णवने देवीच्या डोक्यात प्रेशर कुकर हाणला. ज्यात तिचा मृत्यू झाला. देवीच्या बहिणीने सांगितलं की देवीला फोन लावला पण तिने फोन उचलला नाही. त्यानंतर तिने शेजाऱ्यांना घरी जाऊन पाहण्यास सांगितले. त्यांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांना प्राचारण केले आणि घडला प्रकार समोर आला.

दक्षिण बेंगळुरुचे वरिष्ठ पोलिस अधिकारी सीके बाबा यांनी सांगितलं की, वैष्णवला आपल्या लिव्ह ईन पार्टनरवर संशय होता. यावरुन त्यांच्यात अनेकदा भांडण व्हायचे. शनिवारी झालेल्या भांडणाचे पर्यावसान एकाचा जीव जाण्यात झाले. वैष्णवने देवीच्या डोक्यात प्रेशव कूकर घातला.त्यामुळे तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर वैष्णव पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. पण पोलिसांनी त्यांना पकडले आहे.

bengaluru crime
Nagpur Crime : प्रेमविवाहाला फक्त ६ महिने झाले होते तरी सुरक्षारक्षकाने संशयावरून केला पत्नीचा खून

पोलिसांनी सांगितल्यानुसार, जोडप्याच्या कुटुंबीयांनाही दोघांच्या संबंधांची माहिती होती. तसेच त्यांच्यामध्ये वाद होत असल्याचंही त्यांना माहिती होते. त्यांनी वाद सोडवण्याचा प्रयत्न केला होता. शेजाऱ्यांनी सांगितलं की दोघांमध्ये अनेकदा वाद होत होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.