Crime News: बेंगळुरू येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका खाजगी कंपनीत ऑडिटर म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीला मारहाण केल्याप्रकरणी बेंगळुरू पोलिसांनी शुक्रवारी पाच जणांना अटक केली. या ५ जणांनी कंपनीतील एका कर्मचाऱ्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, सुदैवाने ती व्यक्ती हल्ल्यातून बचावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश नावाच्या व्यक्तीला जीवे मारण्यासाठी त्याच्या ऑफीसमधील कर्मचाऱ्यांनी एका टोळीला सुपारी दिली होती. सुरेशसोबत काम करणारे त्याचे सहकारी त्याच्याकडून मिळणाऱ्या वागणूकीला कंटाळले होते, त्यामुळे त्यांनी सुरेशला मारण्यासाठी सुपारी दिली होती.
पोलिसांनी यांना ताब्यात घेतल्यानंतर आपल्या गुन्ह्याबाबत कबुली देताना त्यांनी सांगितले की, सुरेश कामाच्या ठिकाणी मानसिक दबाव आणतो, कंपनीच्या मालकांसमोर आपला पाणउतारा करतो या रागातून त्याला ठार करण्यासाठी सुपारी दिल्याची कबुली त्यांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश बेंगळुरू येथील एका दूध उत्पादन कंपनीत ऑडिटर म्हणून काम करतो. पोलिसांनी अटक केलेल्या उमाशंकर आणि विनेश हे देखील त्याच्यासोबत कंपनीत काम करत होते. चौकशी केली असता, सुरेशने त्यांच्यावर खूप दबाव टाकल्याचे सांगत आरोपींनी गुन्हा कबूल केला आहे.
दरम्यान, मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. रस्त्यावरून जाणाऱ्या कारच्या डॅश कॅमेऱ्यामध्ये हा व्हिडिओ रेकॉर्ड झाला आहे. या व्हिडिओमध्ये काही जण ऑडिटर सुरेशला कल्याण नगरजवळील रिंग रोडवर लोखंडी रॉडने मारहाण करताना दिसत आहेत.
पोलिसांनी तातडीने कारवाई करत या प्रकरणामध्ये उमाशंकर आणि विनेशला अटक केली. दोघांची कसून चौकशी केली असता आरोपीने सांगितले की, सुरेश वर्षभरापूर्वी कंपनीत रुजू झाला होता आणि तो कठोर ऑडिटिंग अधिकारी होता. कामाच्या ठिकाणी सुरेश त्यांचा बॉस होता आणि तो त्यांना रोज त्रास द्यायचा. रोजच्या व्यवहाराचा हिशोब दिल्यानंतर सुरेश त्यामध्ये शंका काढायचा. त्यामुळे अनेक दिवस या कर्मचाऱ्यांना एकाच व्यवहाराचा हिशोब पुन्हा पुन्हा द्यावा लागायचा. सुरेशच्या त्रासाला कंटाळून दोघांनी एका टोळीला त्याची सुपारी दिली. यातूनच दोघांनी सुरेशला संपवण्याचा निर्णय घेतला. या घटनेनंतर ५ दिवसांनी पोलिसांनी या आरोपींना ताब्यात घेतले आहे.
उमाशंकर आणि विनेशकडून सुपारी घेतलेल्या काही जणांनी कल्याण नगर येथील आऊट रिंग रोड येथे सुरेशला रस्त्याच्या बाजूला बेदम मारहाण केली. ही घटना 31 मार्च रोजी घडली. यानंतर पुढील काही दिवस हा व्हिडीओ बंगळुरुमध्ये मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. त्यानंतर हिन्नूर पोलीस स्टेशनमधील अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करुन 5 एप्रिल रोजी 5 जणांना अटक केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.