Bus चालवताना चालकाला Heart Attack, कंडक्टरने फिल्मी स्टाईलमध्ये स्टेअरिंग हाती घेतले, मात्र... CCTV Video Viral

Bengaluru Bus Driver Heart Attack: सीसीटीव्ही फुटेजचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. ज्यामध्ये BMTC बस चालकाचा कर्नाटकातील बेंगळुरू येथे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, चालक अचानक पुढे झुकला आणि हृदयविकाराच्या झटक्याने पडला. त्यावर कंडक्टरने तात्काळ बस नियंत्रणात आणून प्रवाशांना वाचवले.
Bengaluru Bus Driver Heart Attack
Bengaluru Bus Driver Heart AttackESakal
Updated on

कर्नाटकची राजधानी बेंगळुरूच्या यशवंतपूर भागात बीएमटीसी बस चालवत असताना चालकाला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला. बेंगळुरू मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन अधिकाऱ्यांनी सांगितले की, मृत बस चालक किरण कुमार (३८) हे हसन जिल्ह्यातील रहिवासी असून ते बीएमटीसी डेपो ४० मध्ये काम करत होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.