Scratch Card Fraud: कार्ड स्क्रॅच केलं अन् गमावले 18 लाख रुपये, लिफाफ्याच्या जाळ्यात अडकली महिला; वाचा धक्कादायक प्रकरण

Bengaluru Crime News: ही महिला जाळ्यात अडकल्याचे लक्षात येताच घोटाळेबाजांनी आणखी एक डाव टाकला आणि रक्कम मिळविण्यासाठी तिला 30 टक्के कर भरावा लागेल असे सांगितले.
Bengaluru scratch Card fraud woman loses over 18 lakhs
Bengaluru scratch Card fraud woman loses over 18 lakhsEsakal
Updated on

एका 45 वर्षीय महिलेला तीन महिन्यांहून अधिक काळ चाललेल्या लॉटरी फसवणुकीत 18 लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाले. पश्चिम बंगळुरूमधील अन्नपूर्णेश्वरी नगर येथील महिलेने ७ मे रोजी पोलिस तक्रार केल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे.

FIR नुसार, या महिलेला 28 जानेवारी 2024 रोजी मीशो या ऑनलाइन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून एक लिफाफा मिळाला. या लिफाफ्यात तिला सूचना, संपर्क तपशील आणि स्क्रॅच कार्ड असलेले एक पत्र सापडले, असे वृत्त डेक्कन हेराल्ड या संकेतस्थळाने दिले आहे. (Bengaluru scratch Card fraud woman loses over 18 lakhs)

हा लिफाफा मिळाल्यानंतर त्यामध्ये महिलेला एक स्क्रॅच कार्ड सापडले. त्यानंतर तिने नशीब आजमावायचे ठरवले. कार्ड स्क्रॅच केल्यानंतर या महिलेला 15.51 लाख रुपये जिंकल्याचा मजकूर दिलसा. त्यानंतर तिने पत्रात नमूद केलेल्या 90*******5 वर कॉल केला आणि घोटाळेबाजांशी संपर्क साधला. त्यानंतर महिलेला पत्राचा फोटो, स्क्रॅच कार्ड, तिला मिळालेला लिफाफा आणि तिचे सरकारने जारी केलेले ओळखपत्र शेअर करण्यास सांगण्यात आले. त्यानंतर महिलेने घोटाळेबाजांनी सांगितल्याप्रमाणे केले.

Bengaluru scratch Card fraud woman loses over 18 lakhs
Rahul Gandhi Accepts Challenge: आव्हान स्वीकारलं! PM मोदींसोबत जाहीर चर्चेसाठी राहुल गांधी तयार, म्हणाले, 'पण ते...'

ही महिला जाळ्यात अडकल्याचे लक्षात येताच घोटाळेबाजांनी आणखी एक डाव टाकला. आणि कथितपणे सांगितले की लॉटरी, लकी ड्रॉ इत्यादी कर्नाटकात बेकायदेशीर असल्याने, ती लॉटरीच्या 4 टक्के रकमेवर दावा करू शकणार नाही आणि उर्वरित रक्कम मिळविण्यासाठी तिला 30 टक्के कर भरावा लागेल.

याला पीडित महिलेने होकार दिला आणि पैसे ट्रान्सफर करायला सुरुवात केली. तेव्हा घोटाळेबाजांनी तिला सांगितले की कराची रक्कम जमा झाली नाही आणि तिला ती परत पाठवावी लागेल. लॉटरी जिंकून ती नुकसान भरून काढू शकेल या आशेने, महिलेने घोटाळेबाजांची पुन्हा पैसे पाठवले.

Bengaluru scratch Card fraud woman loses over 18 lakhs
दहशतवादी निज्जरच्या हत्येप्रकरणी आणखी एका भारतीयाला अटक, कॅनडा पोलिसांनी आतापर्यंत ४ जणांना घेतलं ताब्यात

9 फेब्रुवारी ते 8 एप्रिल दरम्यान, महिलेने घोटाळेबाजांना 18,40,168 रुपये पाठवले, पोलिसांनी सांगितले की, ही रक्कम महिलेच्या कॅनरा बँक आणि एसबीआय बँक खात्यातून सात एसबीआय बँक खात्यांमध्ये आरटीजीएसद्वारे पाठवण्यात आली आहे.

या प्रकरणाचा तपास करत असलेल्या सायबर क्राईमच्या तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की, “घोटाळेबाज महिलेला नियमितपणे फोन करून प्रक्रियेबद्दल माहिती देत असत आणि तिला लवकरच पैसे मिळतील असे सांगत. तिला गुंतवून ठेवण्यासाठी, त्यांनी तिला सांगितले की, काही कागदपत्रांची कमतरता आहे आणि ते तिला पाठवावी लागतील. तसेच मिळालेल्या बक्षिसाची रक्कम मिळवण्यासाठी विविध शुल्क भरावे लागतील.”

"या संपूर्ण काळात, पीडितेचा विश्वास होता की तिने लॉटरी जिंकली आहे आणि तिला पैसे मिळतील या आशेने ती घोटाळेबाजांशी गुंतत राहिली," असे अधिकारी म्हणाले.

घोटाळेबाजांशी संपर्क न झाल्याने संजनाने 7 मे रोजी सायबर क्राईम पोलिसांची मदत घेत तक्रार दाखल केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.