घटनास्थळावरून प्रज्वलचा कापलेला हात आणि अंगठा गायब असून भटक्या कुत्र्यांनी तो टाकला असावा, असा पोलिसांना संशय आहे.
बंगळुरू : कर्नाटकातील बंगळुरूमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आलंय. 29 ऑक्टोबरच्या मध्यरात्री एका बारमध्ये झालेल्या हाणामारीनंतर, पश्चिम बंगळुरूमध्ये (Bengaluru) एका 21 वर्षीय तरुणाच्या डाव्या आणि उजव्या हाताचा अंगठा चार बदमाशांनी छाटला आहे.
मूडलपल्यातील (Moodalapalya) रहिवासी प्रज्वल हा बारमध्ये मित्रांसोबत पार्टी करत असताना काही तरुणांनी त्यांच्या टेबलावर टिश्यू पेपर फेकला. त्यानंतर दोन गटांत बाचाबाची झाली. या बाचाबाचीचं रुपांतर हाणामारीत झालं. घटनास्थळावरून प्रज्वलचा कापलेला हात आणि अंगठा गायब असून भटक्या कुत्र्यांनी तो खाऊन टाकला असावा, असा पोलिसांना संशय आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या बेरोजगार असलेला प्रज्वल चहाचं दुकान उघडण्याचा विचार करत होता. 29 ऑक्टोबरच्या रात्री तो मेघराज, योगेश आणि कौशिक या मित्रांसोबत लगरे येथील कदंबा बारमध्ये (Kadamba Bar) गेला होता. पुढच्या टेबलावर तरुणांचा आणखी एक गट पार्टी करत होता. रात्री 11.30 च्या सुमारास प्रज्वल आणि त्याचे मित्र पार्टी करत असलेल्या टेबलावर त्यांच्यापैकी एकानं टिश्यू पेपर फेकला. त्यांनी तरुणांना याबाबत विचारलं आणि दोन्ही बाजूंनी शाब्दिक बाचाबाची झाली. बारमधील इतरांनी हस्तक्षेप केला आणि हा वाद मिटवला.
प्रज्वल आणि त्याच्या मित्रांनी जेवायला जायचं ठरवलं आणि महालक्ष्मी लेआउटजवळील कुरुबाराहल्ली (Kurubarahalli) येथील पाइपलाइन पार्कमध्ये त्यांची बाइक थांबवली. पहाटे 1.30 च्या सुमारास ते तिथं धूम्रपान करत असताना बारमध्ये त्यांच्याशी भांडण करणारे चार तरुण एका कारमधून तिथं आले. इतर तिघांनी प्रज्वल आणि त्याच्या मित्रांवर हल्ला करण्यास सुरुवात केली. या बदमाशांनी प्रज्वलच्या डोक्यात चाकूनं वार केला, परंतु प्रज्वलनं हल्ला रोखण्यासाठी हात वर केले. प्रज्वलच्या डाव्या हाताचं मनगट कापण्यात आलं असून उजव्या हाताचा अंगठाही कापला आहे.
हल्ल्यानंतर टोळीनं घटनास्थळावरून पळ काढला आणि प्रज्वलच्या मित्रांनी त्याला व्हिक्टोरिया हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. प्रज्वलची आई सुधा यांना सकाळी मुलावर झालेल्या हल्ल्याची माहिती मिळाली. त्यांनी तातडीनं रुग्णालयात आणि नंतर गुन्ह्याच्या ठिकाणी धाव घेतली. त्यानंतर त्यांनी महालक्ष्मी लेआउट पोलिसांकडं तक्रार दाखल केली असून कुरुबरहल्ली येथील हरीश आणि अजित यांना संशयित म्हणून पोलिसांकडं नावं दिली आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.