Beti Bachao Beti Padhao : 'मुलींच्या शाळे'ची गरज का भासली? जाणून घ्या इतिहास

.... यातूनच 'मुलींची शाळा' की कन्सेप्ट निर्माण झाली.
Beti Bachao Beti Padhao
Beti Bachao Beti Padhaosakal
Updated on

Beti Bachao Beti Padhao : आज मुलगा मुलगी एक समान मानले जातात. आज समाज वैचारीकदृष्या परिपक्व झालाय पण दिडशे दोनशे वर्षापूर्वी तशी स्थिती नव्हती. मुलींना शिक्षणाचा अधिकार नव्हता. मुलीने शिकलेलं चुकीचं मानायचे. त्यात मुलगा मुलगी सोबत शिकायला जाणे, हे समाजाला मान्य नव्हतं.

अशात मुलींची एक वेगळी शाळा भरवणे गरजेचं होतं जिथे मुलींचे आईवडील त्यांना निसंकोचपणे पाठवू शकेल यातूनच 'मुलींची शाळा' की कन्सेप्ट निर्माण झाली. (Beti Bachao Beti Padhao scheme for girls education and welfare read story)

आजही महाराष्ट्रात गावोगावी अन् शहरी मुलींच्या अनेक शाळा आहेत.आज वस्तुस्थिती बदलली आहे. आईवडीलांची विचारसरणी बदलली आहे. समाज मुलीला शिकण्यास प्रोत्साहन देतोय. घटनेनेही मुला मुलींना समान शिक्षणाचा हक्क दिलाय. त्यामुळे मुलींच्या शाळेकडे बघण्याचा दृष्टीकोन आज बदलाय. आज समाज इतका पुढे गेला की मुला-मुलीतील भेद नाहीसा झालााय.

त्यामुळेच कदाचित मुलींची शाळा वेगळी असणे हे फारसं महत्त्वाचं वाटत नाही पण एक वेळ अशी होती की हीच मुलींची शाळा असणे स्त्री शिक्षणासाठी खूप गरजेचं होतं..

Beti Bachao Beti Padhao
Girls Hostel : ओबीसी मराठा आणि दुर्बल घटकातील मुलींसाठी वसतिगृह कधी सुरू होणार

१७१ वर्षांपूर्वी 'फुले दांपत्यांनी' सुरु केली होती मुलींची पहिली शाळा

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीआई फुले यांनी १ जानेवारी १८४८ रोजी पुणे येथील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. १७१ वर्षांपूर्वी स्त्रि शिक्षणासाठी उचलेलं हे खूप मोठं पाऊल होतं

समाजातील मुली शिकायला हव्या आणि मुलींना शिक्षणाचा अधिकार मिळावा, या उद्देशाने ही शाळा सुरू केली होती यासाठी त्यांना बराच विरोध सहन करावा लागला पण आज त्यांचा उद्देश साध्य झालाय. आज मुली प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहे.

Beti Bachao Beti Padhao
#Modi Ji Ki Beti: कोण आहे 'मोदीजी की बेटी?' सगळ्यांनाच पडलाय प्रश्न

बेटी बचाओ बेटी पढाओ हे अभियान मोदी सरकारने २२ जानेवारी २०१५ रोजी सुरू केले होते. या योजनेअंतर्गत समाजात मुलींसोबत केलेली नकारात्मक वागणूकला आळा घालण्यासाठी सोबतच या विषयी जागरुक करण्यासाठी आणि मुलींच्या करीअर आणि भविष्याला उज्वल करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. या योजने अंतर्गत सरकारने मुलींच्या कल्याणासाठी अनेक योजना आणल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.