नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी मोठी बातमी आहे. बँकिंग, फायनॅन्शिअल सर्व्हिसेस आणि इन्शुरन्स (BFSI) क्षेत्रामध्ये येत्या काळात भरपूर रोजगार उपलब्ध होणार आहेत. क्रेडिट कार्ड सेल, पर्सनल फायनान्स आणि रिटेल इन्शुरन्स विक्रीमध्ये वाढ झाल्यामुळे या संधी उपलब्ध होणार आहेत.
लोकांची खर्च करण्याची क्षमता वाढल्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे. त्यामुळे 2023 च्या दुसऱ्या सहामाहीत या क्षेत्रात तब्बल 50 हजार नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता आहे. टीमलीज कंपनीने याबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला आहे.
ऑगस्ट महिन्यांपासून भारतात सगळीकडे सणांची रेलचेल असते. पुढच्या पाच महिन्यांपर्यंत देशात कित्येक मोठे सण असतात. यामुळे लोकांची खरेदी वाढते. यासाठी कित्येक लोक क्रेडिट कार्डचा वापर करतात. यामुळे BFSI सेक्टरमध्ये कर्मचाऱ्यांची मोठी मागणी आहे.
यामध्ये ई-कॉमर्स, रिटेल, कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल्स आणि स्मार्टफोन या क्षेत्रांचा समावेश आहे. क्रेडिट कार्ड, पर्सनल लोन आणि इन्शुरन्स प्रॉडक्टची देखील मागणी वाढते आहे.
सणासुदीच्या काळात या क्षेत्रातील तात्पुरत्या कर्मचाऱ्यांची मागणी नेहमीच वाढते. विशेषतः अहमदाबाद, पुणे, बंगळुरू, कोलकाता, कोची, विशाखापट्टणम, मदुराई, लखनऊ, चंदिगढ, अमृतसर, भोपाळ आणि रायपूर या शहरांमध्ये ही वाढ दिसून येते.
या कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या पगार किंवा भत्त्यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 7 ते 10 टक्के वाढ झाल्याचं दिसत आहे. टीमलीजच्या रिपोर्टनुसार, ऑन-दि-फीट रोलसाठी दिल्ली, मुंबई आणि बंगळुरूमध्ये 20 ते 22 हजार रुपये पगार देण्यात येतो आहे.
टीमलीजचे उपाध्यक्ष कृष्णेंदू चॅटर्जी यांनी सांगितलं, की येत्या काही पाच ते सहा महिन्यांमध्ये या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात भरती होणार आहे. याची सुरूवात आधीपासूनच झाली असून, गेल्या दोन महिन्यांमध्ये सुमारे 25,000 ओपनिंग्स भरल्या असल्याची माहिती चॅटर्जी यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.