केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी देशभरात आज भारत बंदची हाक दिली आहे. या भारत बंदमध्ये शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या महामार्गांवर चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. याशिवाय रेल्वे मार्गही रोखणार असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं आहे. दिल्लीत या पार्श्वभूमीवर गाझीपूर सीमेवर वाहतूक बंद करण्यात आली आहे.
आमचा भारत बंद यशस्वी झाला. आम्हाला शेतकऱ्यांकडून पूर्ण पाठिंबा होता. आम्ही सगळं काही सील केलं नाही. काही महत्त्वाच्या गोष्टी बंद पडू दिलेल्या नाहीत. आम्ही सरकारसोबत चर्चेसाठी तयार आहे पण चर्चाच होत नाही अशी प्रतिक्रिया भारत किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी दिली.
मुंबई - शेतकरी आंदोलनाच्या भारत बंद च्या पार्श्वभूमीवर आज ता. 27 रोजी सायन सर्कल येथे निदर्शने केली गेली. सायन सर्कल येथील आंदोलनात काँग्रेसचे नेते डॉ. भालचंद्र मुणगेकर, हुसेन दलवाई, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नवाब मलिक, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड प्रकाश रेड्डी, मिलिंद रानडे, शेतकरी कामगार पक्षाचे ऍड राजेंद्र कोरडे सहभागी झाले होते
हरयाणाच्या सिंघु सीमेवर एका शेतकऱ्याचा आंदोलनावेळी मृत्यू झाला असल्याचं समोर येत आहे. मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव भगेल राम असं आहे. शेतकऱ्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचं पोलिसांचे म्हणणे आहे. याबाबतची अधिक माहिती शवविच्छेदन अहवालानंतर समोर येईल.
कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी तामिळनाडुत पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स तोडले. यावेळी पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतलं. पोलिस आणि आंदोलकांमध्ये झालेल्या झटापटीनंतर ही कारवाई करण्यात आली.
पिंपरी चिंचवड : संयुक्त किसन मोर्चा कामगार संघटना, संयुक्त कृती समिती जन आंदोलन संघर्ष समिती, महाविकास आघाडी महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने भारत बंद-जनआक्रोश आंदोलन पिंपरी येथील आंबेडकर चौकात सुरू आहे. या वेळी कामगारांचा तसेच नागरिकांचा लक्षणीय सहभाग दिसून येत आहे. यावेळी चौकात वाहतूक कोंडी दिसून येत असून पोलीसांचा चोख बंदोबस्त आहे.
पुण्यात भारत बंदला प्रतिसाद नाही
कृषी कायद्याविरोधातील भारत बंद आज सुरु आहे. मात्र पुण्यात याला फारसा प्रतिसाद नाही. विविध संघटना आणि राजकीय पक्षांकडून निदर्शने करण्यात येत आहेत. मंडईतील टिळक पुतळ्यासमोर निदर्शने सुरु असून यामध्ये राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनासुद्धा सहभागी झाले आहेत. मोदी सरकारविरोधात आंदोलकांनी यावेळी घोषणाबाजी केलीय.
दिल्ली-एनसीआरमध्ये सर्व ठप्प झाले आहे. नोएडाच्या DND सह गुरुग्राम दिल्ली सीमेवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.
शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदमध्ये आम्ही काही सील केलेलं नाही. आम्हाला फक्त संदेश द्यायचा आहे. बंदच्या काळात अॅम्ब्युलन्स, डॉक्टर्स यांच्यासह अत्यावश्यक काम असलेल्यांना सोडण्यात येईल. दुकानदारांना आम्ही आवाहन केलं आहे की त्यांनी चार वाजेपर्यंत सर्व बंद ठेवावं. त्यानंतर दुकाने उघडावीत. इथं बाहेरून कोणीही शेतकरी आलेले नाहीत असंही राकेश टिकैत यांनी सांगितलं.
पंजाब हरियाणाच्या शंभु सीमेवरही शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला आहे. सायंकाळी चार वाजेपर्यंत रास्ता रोको करणार असल्याचं याठिकाणी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी म्हटलं आहे.
भारत बंदच्या पार्श्वभूमीवर दिल्ली- अमृतसर राष्ट्रीय महामार्गावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको
गाझीपूर सीमेवर भारत बंदच्या निमित्ताने शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.