'कोवॅक्सिन'ला WHO मंजुरी देणार?; भारत बायोटेकची महत्त्वपूर्ण बैठक

Covaxin
Covaxin
Updated on
Summary

भारत बायोटेकने तयार केलेली कोव्हॅक्सिन ही स्वदेशी बनावटीची लस ७७.८ टक्के एवढी प्रभावी असल्याचे दिसून आले.

नवी दिल्ली- भारत बायोटेकने तयार केलेली कोव्हॅक्सिन ही स्वदेशी बनावटीची लस ७७.८ टक्के एवढी प्रभावी असल्याचे दिसून आले. त्यानंतर भारत बायोटेक कंपनी कोवॅक्सिन लशीला जागतिक आरोग्य संघटनेकडून (WHO) आपात्कालीन वापरासाठी मंजुरी मिळावी यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. तिसऱ्या टप्प्यातील निष्कर्ष तपशील सादर करण्याआधी भारत बायोटेकटचे प्रतिनिधी आणि जागतिक आरोग्य संघटनेमध्ये आज बैठक होणार आहे. भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लशीला अद्याप जागतिक आरोग्य संघटनेने मंजुरी दिलेली नाही. (Bharat Biotech to attend pre-submission meet for Emergency Use Listing of COVAXIN by WHO today)

कोवॅक्सिन लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचे निष्कर्ष जाहीर झाले असून त्यामध्ये २५ हजार ८०० लोक सहभागी झाले होते. मागील आठवड्यामध्येच कंपनीने यासंबंधीचा अहवाल औषध नियंत्रकांच्या तज्ज्ञ समितीकडे सोपविला होता. याबाबत तज्ज्ञांच्या समितीची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली, त्यामध्ये या डेटाला मान्यता देण्यात आली. तज्ज्ञांच्या मान्यतेनंतर हा अहवाल आता जागतिक आरोग्य संघटनेसमोर देखील सादर करता येईल. भारत बायोटेकने भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या सहकार्याने (आयसीएमआर) या लसीची निर्मिती केली आहे. कंपनीने सादर केलेल्या डेटाचा सखोल अभ्यास केला असता या लसीमुळे रुग्णाचे रुग्णालयामध्ये दाखल होण्याचे प्रमाण आणि संसर्ग दोन्ही कमी होत असल्याचे आढळून आले आहे. मागील महिन्यामध्ये भारत बायोटेकने कोव्हॅक्सिनला सप्टेंबर महिन्यापर्यंत जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता मिळेल अशी शक्यता वर्तविली होती.

फायझरच्या लशीलाही मान्यता मिळणार

जगभर चर्चेचा विषय ठरलेल्या फायझर कंपनीच्या लसीच्या मान्यतेची प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अल्बर्ट बोउर्ला यांनी सांगितले. या लसीच्या खरेदीबाबत भारत सरकारची सध्या अमेरिकेसोबत चर्चा सुरू आहे. दरम्यान, भारतात सध्या तीन लशींच्या वापराला परवानगी आहे. यात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोविशिल्ड, भारत बायोटेकची कोवॅक्सिन आणि लशीच्या स्पुटनिक 5 लशींचा समावेश आहे. देशात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली असून आतापर्यंत जवळपास २९ लाख लोकांना लशीचा किमान एक डोस मिळाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()