नवी दिल्ली : राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रेला उद्यापासून मणिपूरमधून सुरुवात होत आहे. यापार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे वरिष्ठ नेते सरचिटणीस जयराम रमेश यांनी या यात्रेची भूमिका स्पष्ट केली आहे. ही राजकीय यात्रा असली तरी निवडणुकीसाठीची यात्रा नाही, असं त्यांनी सांगितलं. यामागची कारणमिमांसाही त्यांनी केली आहे. (Bharat Jodo Nyay Yatra Political But Not Electoral Explanation by Jairam Ramesh)
पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना रमेश म्हणाले, "ही राजकीय पक्षानं काढलेली यात्रा आहे. राजकीय पक्षांनी काढलेल्या यात्रा या एनजीओनं काढलेल्या यात्रांसारख्या नसतात. आमची ही राजकीय यात्रा आहे ती देशाच्या संविधानाचं संरक्षण करण्यासाठी आहे. पण ती निवडणुकीसाठीची तयारी करणारी यात्रा नाही. त्यामुळं तुम्ही राजकीय यात्रा आणि निवडणुकीसाठीची यात्रा यातला फरक समजून घ्या" (Latest Marathi News)
रमेश पुढे म्हणाले, भारत जोडो न्याय यात्रेला उद्यापासून अर्थात १४ जानेवारीपासून सुरुवात होत आहे. मणिपूरच्या थोबल इथून याचा शुभारंभ होत आहे. उद्या राहुल गांधी हे सकाळी ११ वाजता इंफाळला जातील तिथं ते पहिल्यांदा खोंगजोम वॉर मेमोरियल या ऐतिहासिक ठिकाणाला भेट देतील. या वॉर मेमोरियलचं उद्घाटनं माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी केलं होतं. याचं महत्व केवळ मणिपूरसाठीचं नाही तर संपूर्ण देशासाठी आहे, असंही ते यावेळी म्हणाले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.