Rahul Gandhi भेटले कोट्यवधी सबस्क्राइबर्स असलेल्या युट्यूब चॅनलच्या सदस्यांना

Rahul Gandhi
Rahul Gandhi
Updated on

कन्याकुमारी - भारत जोडो यात्रेत सहभागी झालेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कन्याकुमारीमधील लोकप्रिय यूट्यूब चॅनल व्हिलेज कुकिंग चॅनलच्या सदस्यांची भेट घेतली. हे YouTube चॅनल खुल्या शेतात पारंपारिक अन्न शिजवण्याच्या व्हिडिओसाठी ओळखले जाते. (Rahul Gandhi News in Marathi)

Rahul Gandhi
राहुल गांधींच्या 41 हजारांच्या शर्टवरून वातवरण तापलं; भाजपनं करून दिली 1971 ची आठवण

गेल्या वर्षी राहुल गांधी यांनी निवडणूक प्रचारादरम्यान या चॅनेलच्या सदस्यांसोबत मशरूम बिर्याणी बनवली होती. त्याने हे चॅनल देशभरात सर्वांना माहित झालं. तमिळनाडूमधील हे पहिलेच YouTube चॅनल आहे ज्याचे एक कोटीहून अधिक सदस्य आहेत.

गेल्या वर्षीच्या व्हिडीओमध्ये राहुल गांधी बिर्याणी बनवणाऱ्या कूकींग टीममध्ये सामील झाले होते. त्यावेळी त्यांनी मशरूम बिर्यानी डिश बनवण्यात मदत केली होती. हे चॅनेल 2018 मध्ये केटरर पेरियाथांबी यांनी सुरू केले होते. त्याच्या चॅनलचे सबस्क्राइबर्स सध्या एक कोटी 80 लाखांवर पोहोचले आहेत. त्यांचे नातू अयानार, मुरुगेसन, तमिलसेल्वन, मुथुम्निकम आणि सुब्रमण्यम हे चॅनलचे सदस्य आहेत.

सहा सदस्यांच्या टीमने सुरुवातीला फक्त वेळ घालवण्यासाठी Youtube चॅनल सुरू केले होते. पण लवकरच त्यांचा कंटेन्ट व्हायरल झाला. प्रत्येक व्हिडिओसोबत त्यांच्या व्ह्यूजची संख्या वाढलतच गेली. या YouTube चॅनेलच्या व्हिडिओंमधील लोक पारंपरिक पद्धतीने दक्षिण भारतीय खाद्यपदार्थ शेतात बनवताना दिसतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.