Bharat Jodo Yatra Video : जेव्हा राहुल गांधीच म्हणतात, ओके..टाटा..बाय-बाय..खतम! Rahul Gandhi

Rahul Gandhi On Image
Rahul Gandhi On ImageEsakal
Updated on

नवी दिल्लीः आपल्या भारतात जेवढे मीम्स बनतात त्यामध्ये राहुल गांधींचा तो विशिष्ट चंक टाकल्याशिवाय त्या मीमला पूर्णत्वच येत नाही. परंतु जेव्हा राहुल गांधी स्वतःच ओके..टाटा.बाय-बाय..खतम, असं म्हणतात तेव्हा काय होईल?

होय. असंच झालंय. स्वतः राहुल गांधींनी स्वतःच या मीम मटेरियलचा आनंद घेतला. निमित्त होतं पत्रकार कामिया जानी यांनी घेतलेल्या मुलाखतीचं. कामिया ह्या यू ट्युबरदेखील आहेत. दिग्गज लोकांसोबत जेवण घेत गप्पा मारत असतात.

कामिया यांनी एक व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्या व्हीडिओमध्ये राहुल गांधी सर्व आईस्क्रिम संपवतात आणि ओके..टाटा..खतम. बाय-बाय.. असं म्हणतात. हा व्हीडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय.

प्रवास, त्यांचे आवडते अन्न, स्कूबा डायव्हिंग आणि मार्शल आर्ट.. याबद्दल गप्पा मारल्याचं कामिया यांनी सांगितलं. भारत जोडो यात्रेनिमीत्त काँग्रेसचे नेते राहुल गांधी सध्या जम्मू-काश्मीरमध्ये आहेत. यावेळी राहुल गांधी यांनी ही खास मुलाखत दिली.

Rahul Gandhi On Image
Rahul Gandhi : लग्न कधी करणार ते पहिला पगार किती मिळाला? राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं

या मुलाखतीमध्ये राहुल गांधींनी त्यांच्या आयुष्यातील अनेक लहान-मोठी पैलूंवर भाष्य केलं आहे. यादरम्यान त्यांनी वैयक्तिक आयुष्यातील अनुभव आणि सवयीही शेअर केल्या.

राहुल गांधींना विचारण्यात आलं खी तुम्हाला काय खायला आवडते? यावर त्यांनी उत्तर दिलं की, मी सर्व काही खातो. जे मिळेल ते खातो. मात्र, मला फणस आणि वाटाणे आवडत नाहीत. जेव्हा मी घरी असतो तेव्हा मी काय खातो आणि काय पितो याबद्दल मी खूप काळजी घेतो.

सतत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नावर राहुल गांधी यांनी योग्य मुलगी सापडली की लग्न करू, असे उत्तर दिलं. ते म्हणाले की, अट एकच आहे की मुलगी हुशार असावी, असे राहुल गांधी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.