भारत की इंडिया पाठ्यपुस्तकामध्ये कोणता शब्द वापरणार? NCERT प्रमुखांनी केला खुलासा

Bharat or India: एनसीईआरटीच्या पुस्तकांमध्ये भारत की इंडिया या दोन्हीपैकी कोणता शब्द वापरला जाईल असा प्रश्न विचारला जात होता.
BOOKS
BOOKS
Updated on

नवी दिल्ली- एनसीइआरटीच्या (NCERT) अभ्यासक्रमातून काही मजकूर हटवण्यात आल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. त्यातच एनसीईआरटीच्या पुस्तकांमध्ये भारत की इंडिया या दोन्हीपैकी कोणता शब्द वापरला जाईल असा प्रश्न विचारला जात होता. याप्रकरणी एनसीईआरटीचे प्रमुख दिनेश प्रसाद सकलानी यांनी खुलासा केला आहे. पाठ्यपुस्तकांमध्ये दोन्ही शब्द वापरले जातील असं ते म्हणाले आहेत.

सकलानी म्हणाले की, 'हा वाद निरर्थक आहे. देशाच्या संविधानामध्ये यो दोन्ही शब्दांचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही शब्द पाठ्यपुस्तकामध्ये वापरण्यात येईल. इंडिया सोडून फक्त भारत हा शब्द वापरण्याचा कोणताही विचार नाही. दोन्ही शब्द एकमेकांच्या बदली वापरले जाऊ शकतात.याबाबत कोणताही वाद नाही.' सामाजिक विज्ञानच्या एका उच्चस्तरिय समितीने इंडिया ऐवजी भारत हा शब्द वापरला जावा अशी शिफारस केली होती. त्यामुळे यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता होती. पण, सकलानी यांनी वादावर पडदा टाकला आहे.

BOOKS
NCERT Syllabus : सकारात्मक विचारांची पिढी घडवायची आहे;गुजरात दंगल, बाबरी मशिदीचा उल्लेख वगळल्याबाबत सकलानींचे प्रतिपादन

सकलानी म्हणाले की, 'दोन्ही एकमेकांना पुरक शब्द आहेत. आपण भारतही वापरू शकतो आणि इंडिया देखील वापरू शकतो. कारण, संविधानामध्ये तसंच म्हणण्यात आलं आहे. यात वादाचे कोणतेही कारण नाही. ज्या ठिकाणी भारत योग्य वाटेल त्याठिकाणी भारत वापरु आणि ज्याठिकाणी इंडिया ठीक वाटेल तिथे इंडिया वापरू. कोणत्या एका शब्दाबाबत आम्ही विरोध करणार नाही.'

एनसीईआरटीच्या जुन्या पुस्तकांमध्ये दोन्ही शब्द वापरण्यात आले आहेत. त्यामुळे नव्या पुस्तकात देखील दोन्ही शब्द वापरले जातील. मुळात हा वादच बिनाकामाचा आहे, असं सकलानी म्हणालेत. त्यामुळे इंडिया की भारत या चर्चांवर पडदा पडण्याची शक्यता आहे.

BOOKS
NCERT ने अयोध्येचा अध्याय बदलल्याने राम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास संतापले, काय म्हणाले वाचा?

NCERT चा अभ्यासक्रम ठरवण्यासाठी मागील वर्षी एका समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीने इंडिया शब्दाऐवजी भारत हा शब्द वापरला जावा अशी शिफारस केली होती. तसेच प्राचीन इतिहास याऐवजी क्सालिकल इतिहास असा अभ्यासक्रमात उल्लेख करण्यास सांगितले होते. एनसीईआरटीने यासंदर्भात कोणताही निर्णय झाला नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.