PM Modi: उदयनिधींच्या 'सनातन' वक्तव्यावर योग्य प्रत्युत्तर द्या; पंतप्रधान मोदींच्या मंत्र्यांना सूचना

PM Modi
PM Modi
Updated on

New Delhi News - तमिळनाडू सरकारमधील मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माबाबत केलेल्या वक्तव्यावरुन राजकारण तापलं आहे. उदयनिधी यांचा भाजप नेत्यांकडून निषेध केला जात असून त्यांच्यावर जोरदार टीका सुरु आहेत.

त्यातच कॅबिनेट बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्र्यांना यासंदर्भात महत्त्वाच्या सूचना दिल्या असल्याची माहिती आहे. उदयनिधी यांना सडेतोड पण तर्कावर आधारित योग्य उत्तर द्या, असं पंतप्रधानांनी मंत्र्यांना सांगितल्याची माहिती आहे.

PM Modi
Kirit Somaiya News : भाजप नेते किरीट सोमय्या आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणात मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी...

सनातन धर्मावरुन सुरु झालेल्या वादावर तर्कावर आधारित योग्य उत्तर दिलं जावं. भारत आणि इंडिया या वादा ऐवजी सनातन धर्मावरुन सुरु झालेल्या चर्चेवर जास्त लक्ष द्या. सनातन धर्मावरुन विरोधक करत असलेल्या टीकेवर योग्य प्रत्युत्तर दिलं जावं.

अभ्यासपूर्ण आणि तर्कावर आधारित उत्तर दिलं जावं, असं पंतप्रधान मोदी कॅबिनेट बैठकीत मंत्र्यांना म्हणाले आहेत. त्यामुळे सनातन या मुद्द्यावरुन राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे.

PM Modi
Sanatan Dharma Row : सनातन धर्माबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य भोवणार! उदयनिधी स्टॅलिन, प्रियांक खरगे अडचणीत

भाजपच्या सूत्रांनी सांगितलं की, उदयनिधी यांच्या वक्तव्याचा २०२४ च्या निवडणुकीसाठी मुद्दा बनवला जाऊ शकतो. पुढील वर्षी राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. त्यामुळे सनातन धर्मावरुन भाजपला एक चांगला मुद्दा मिळू शकतो.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, इतिहासात न जाता संविधानाच्या माध्यमातून तथ्यावर आधारित उत्तर दिले जावे.सध्याची स्थिती लक्षात घेऊन योग्य उत्तर दिले जावे.

पंतप्रधान मोदी यांनी इंडिया नावाच्या प्रकरणावर नेत्यांनी काळजीने बोलण्याचा सल्ला दिला आहे. पक्षाचे प्रवक्ता किंवा ज्याला जबाबदारी दिली जाईल, त्यानेच बोलावं असं मोदींनी नेत्यांना सांगितलं. कोणीही विचार न करता बोलू नये, असंही त्यांनी सांगितल्याचं कळतंय.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उदयनिधी यांच्यावर टीका केली होती. विरोधकांचा हिंदू धर्मावरील द्वेष यातून दिसतोय, असं शाह म्हणाले होते. काँग्रेस नेत्यांनी यावरुन सावध पवित्रा घेतला आहे. दुसरीकडे भाजप नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सनातन वक्तव्यावरुन उदयनिधी स्टॅलिन यांच्यावर टीका केली.

(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.