2035 पर्यंत 'भारतीय अंतराळ स्टेशन' अन् 2040 पर्यंत 'भारतीयाची चंद्रावर स्वारी'; PM मोदींनी निश्चित केलं टार्गेट

गुरुचं ऑर्बिटर मिशन अन् मंगळयानाबाबत काम सुरु करण्याचे निर्देशही यावेळी मोदींनी वैज्ञानिकांना दिले.
PM Modi ISRO Speech
PM Modi ISRO SpeecheSakal
Updated on

नवी दिल्ली : चांद्रयान ३ आणि आदित्य L1 च्या यशस्वीतेनंतर आता भारतानं आणखी दोन महत्वाकांक्षी अंतराळ मोहिमा राबवण्याचा मानस व्यक्त केला आहे. यामध्ये भारताचं स्वतःचं अंतराळ स्टेशन स्थापन करणं आणि चंद्रावर भारतीयाला पाठवणं या दोन मोहिमांचा समावेश आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याबाबत एका उच्चस्तरीय बैठकीत अंतराळ विभागाला हे ध्येय निश्चित करण्याचे निर्देश दिले. (Bharatiya Antariksha station by 2035 and first Indian to Moon by 2040 India set up aims)

PM Modi ISRO Speech
Gaganyaan: गगनयान मिशनच्या टेस्टिंगची तारीख ठरली! जाणून घ्या डिटेल्स

मोदींचे निर्देश

पीएमओनं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं की, "पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताच्या महत्वाकांक्षी गगनयान मोहिमेच्या तयारीची माहिती जाणून घेण्यासाठी एक उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. यावेळी अंतराळ विभागाच्या अधिकाऱ्यांनी या मोहिमेबाबत सविस्तर माहिती दिली. यासाठी वापरण्यात येणाऱ्या नव्या तंत्रज्ञानाचीही माहिती यावेळी देण्यात आली. (Marathi Tajya Batmya)

PM Modi ISRO Speech
Ajit Pawar: मीरा बोरवणकरांच्या कथित आरोपांवर अजित पवारांचं स्पष्टीकरण; थेट सादर केलं 'ते' पत्र

शनिवारी गगनयान चाचणी मोहिम

अधिकाऱ्यांनी सांगितलं की, गगनयानसाठी २० महत्वाच्या चाचण्या केल्या जातील ज्यामध्ये ३ मानवविरहित मिशनच्या चाचण्यांचा समावेश आहे. यासाठी ह्युमन रेटेड लॉन्च व्हेईकलचा (HLVM3) या यानाचा वापर केला जाणार आहे. यासाठीची पहिलं चाचणी मिशन २१ ऑक्टोबर रोजी लॉन्च केलं जाणार आहे. (Latest Marathi News)

PM Modi ISRO Speech
Same Sex Marriage: "आता आमदार-खासदारांनी आमच्यासाठी लढायचं"; याचिकाकर्त्यांनी सांगितला पुढचा प्लॅन

भारतीय अंतराळ स्टेशन

दरम्यान, नुकत्याच यशस्वी ठरलेल्या चांद्रयान ३ आणि आदित्य एल १ मिशननंतर अंतराळ मोहिमांमध्ये भारताचं प्राधान्य वाढावं यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. याबाबत निर्देश देताना पंतप्रधान म्हणाले की, भारतानं आता नवी ध्येयं निश्चित केली पाहिजेत.

यामध्ये सन २०३५ पर्यंत 'भारतीय अंतरिक्ष स्टेशन'ची निर्मिती तर सन २०४० पर्यंत चंद्रावर पहिला भारतीय पाठवण्याच्या ध्येयांचा समावेश आहे, असंही या निवेदनात पुढे म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.