Bhartruhari Mahtab: बीजेडी सोडून भाजपमध्ये आले अन् लोकसभेचे हंगामी अध्यक्ष झाले, कोण आहेत भृतहरि महताब

Pro-tem Speaker: लोकसभा निवडणुकीपूर्वी, महताब यांनी बिजू जनता दल सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. कटक मतदारसंघातून ते अनेकदा खासदार म्हणून निवडून आले आहेत.
Bhartruhari Mahtab Pro-tem Speaker of 18th Lok Sabha
Bhartruhari Mahtab Pro-tem Speaker of 18th Lok SabhaEsakal

भारतीय जनता पक्षाचे खासदार भर्तृहरी महताब यांनी सोमवारी 24 जून रोजी लोकसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून शपथ घेतली. विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतल्यानंतरही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना हंगामी अध्यक्षपदाची शपथ दिली.

26 जून रोजी नव्या लोकसभा अध्यक्षांची निवड होईपर्यंत ते संसदेच्या कनिष्ठ सभागृहाच्या कामकाजाचे अध्यक्षपद भूषवतील. त्यांच्या नियुक्तीवर काँग्रेसकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. कारण लोकसभेत जो खासदार सर्वाधिक वेळा निवडून येतो त्याची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड केली जाते.

काँग्रेसचे खासदार के सुरेश हे सध्या संसदेत सर्वाधिक 8 वेळा निवडून गेले आहेत. त्यामुळे हंगामी अध्यक्ष म्हणून के सुरेश यांची निवड केली जावी अशी मागणी काँग्रेसने केली होती.

भाजप सरकारने संसदीय नियमांचे उल्लंघन हंगामी अध्यक्षांची निवड केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

कोण आहेत भर्तृहरी महताब?

भर्तृहरी महताब हे अनुभवी राजकारणी आहेत आणि 1998 पासून ते संसदेचे सदस्य आहेत. ते ओडिशाचे दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेले दिवंगत हरेकृष्ण महाताब यांचे चिरंजीव आहेत.

लोकसभा निवडणुकीपूर्वी, महताब यांनी बिजू जनता दल सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. कटक मतदारसंघातून ते अनेकदा खासदार म्हणून निवडून आले आहेत.

Bhartruhari Mahtab Pro-tem Speaker of 18th Lok Sabha
Lok Sabha Session 2024: बंगला, गाडी, मोफत प्रवास, मोफत टोल! जाणून घ्या आजपासून 280 नव्या खासदारांना कोणकोणत्या सुविधा मिळणार?

मागील (17 व्या) लोकसभेत, महताब यांनी कामगार, वस्त्रोद्योग आणि कौशल्य विकास स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले होते. ते त्यांच्या वडिलांनी स्थापन केलेल्या प्रजातंत्र या ओडिया दैनिकाचे संपादक म्हणूनही काम करतात.

ओडिशातील लोकसभा आणि विधानसभा दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपच्या दणदणीत विजयानंतर त्यांची आता लोकसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपने ओडिशातील लोकसभेच्या २१ पैकी २० जागा जिंकल्या, तर विधानसभेत ७८ जागा मिळवून राज्यात सरकार स्थापन केले.

Bhartruhari Mahtab Pro-tem Speaker of 18th Lok Sabha
Leader Of Opposition : देशाच्या स्वातंत्र्यानंतर कसा मिळाला संसदेच्या विरोधी पक्षनेते पदाला वैधानिक दर्जा, जाणून घ्या

लोकसभेचे हंगमी अध्यक्ष म्हणजे काय?

प्रोटेम स्पीकरचे प्राथमिक काम नवनिर्वाचित खासदारांना शपथ देणे आणि लोकसभेच्या नव्या अध्यक्षांची निवड होईपर्यंत सभागृहाच्या कामकाजावर देखरेख करणे आहे.

लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनापूर्वी अध्यक्षाचे पद रिक्त झाल्याने घटनेच्या कलम 94 नुसार हंगामी अध्यक्षांची नियुक्ती आवश्यक असते.

आता हंगामी अध्यक्ष 26 जून रोजी होणाऱ्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या निवडणुकीवरही देखरेख करतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com