Bhaurao Patil Death Anniversary : थोर समाजसुधार आणि शिक्षणप्रसारक कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज पुण्यतिथी. कोल्हापूरातील कुंभोज गावी जन्मलेल्या भाऊराव पाटलांची ख्याती मोठी होती. त्यांचा जन्म जैन कुटुंबात झाला होता. भाऊरावांचे प्राथमिक शिक्षण हे कुंभोजमध्येच पूर्ण झाले आणि त्यानंतर पुढील शिक्षणासाठी कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये त्यांना पुढील शिक्षणासाठी दाखल करण्यात आले. याच काळात त्यांच्यावर महर्षी शाहू महाराजांच्या विचाराचा तगडा प्रभाव पडला.
स्वावलंबाने कष्ट करून शिका हा त्यांचा मंत्र होता. सर्वसामान्यांपर्यंत शिक्षण पोहोचावं म्हणून त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. जोतीराव फुले यांनी सुरु केलेल्या सत्यशोधक समाजाचे ते एक महत्वाचे सदस्य होते. भाऊराव पाटील यांना समाजातील उत्कृष्ट कामगिरीसाठी पद्मभूषण हा पुरस्कारही मिळाला. आज त्यांची 63 वी पुण्यतिथी. त्यानिमित्ताने त्यांच्या तुम्हाला माहिती नसलेल्या काही आठवणींना उजाळा देऊया.
भाऊराव पाटील यांच्यावर शाहू महाराजांच्या विचारांचा प्रभाव असल्याने ते पुढील काळात साताऱ्यात जाऊन शिकवण्या घेऊ लागले. याच काळात त्यांनी मदवानमास्तर, भाऊसाहेब कुदळे, ननासाहेब येडेकर या मंडळींसह दुधगावात ‘दुधगाव शिक्षण मंडळ’ स्थापन केले.
रयत शिक्षण संस्थेची स्थापना
भाऊराव पाटील यांनी ४ ऑक्टोबर १९१९ मध्ये रयत संस्थेची स्थापना कऱ्हाड जवळच्या काले गावात केली. १९२४ मध्ये संस्थेचे कार्यालय सातारा येथे हलवण्यात आले. मागासवर्गीय विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी. या उद्देशाने या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. तसेच मुलांना योग्य शिक्षण देत जुन्या चालीरीती, परंपरा मोडून काढत नव्या विचारांना चालना देणे हा त्यांचा हेतू होता. (Karmveer Bhaurao Patil)
पैशाअभावी त्यांची पत्नीचे दागिने विकले, मात्र समाजकार्य थांबू दिले नाही
विद्यार्थी घडावा यासाठी त्यांनी सातारा येथे छत्रपती शाहू बोर्डिंग गे मोठे वसतिगृह बांधले मात्र त्याच्यासाठी पैसा कमी पडला. एवढ्यासाठी कार्य बंद पडता कामा नये म्हणून त्यांना पत्नीचे दागिणे विकले. फेब्रुवारी १९२७ मध्ये या वसतिगृहाचे काम छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस असे नामकरण झाले. या संस्थेसाठी गांधीजींनी हरिजन फंडातून दरवर्षी ५०० रुपये देणगी देण्यास सुरुवात केली. १९४७ मध्ये असा अनेक हायस्कूलची स्थापना झाली.
त्यांना कर्मवीर ही पदवी कशी मिळाली
शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार करून जीवनमान उंचावण्याच्या उद्देशाने सुरु केलेल्या रयत संस्थेचे सर्व जाती-धर्मांच्या विद्यार्थ्यांसाठी 38 वसतिगृहे असलेल्या शाळा आणि हायस्कूल सुरू केली, तसेच 578 शाळा, सहा ट्रेनिंग कॉलेज, 108 हायस्कूल आणि तीन महाविद्यालये सुरू झाली. त्यामुळे महाराष्ट्रातील लोकांनी त्यांना कर्मवीर अशी पदवी दिली. कृतिशील राजा असा त्याचा अर्थ होतो. रयत शिक्षण संस्था ही महाराष्ट्रातील फार मोठी शिक्षण संस्था ठरली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.