जयपूर : भीम आर्मीचे (Bhim Army) प्रमुख चंद्रशेखर आझाद (Chandrashekhar) यांना राजस्थान पोलिसांनी अटक केली आहे. कोरोना साहाय्यकांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी चंद्रशेखर आले होते. उदयपूर हत्याकांडामुळे लागू केलेले कलम १४४ पाहता शांतता भंग होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी चंद्रशेखर यांना अटक केली आहे. चंद्रशेखर यांची दोन दिवसांसाठी तुरुंगात रवानगी करण्यात आली होती. (Bhim Army Chief Chandrashekhar arrested in Jaipur)
जयपूरमध्ये (Jaipur) कोरोना (corona) आरोग्य साहाय्यकांचे आंदोलन तीन महिन्यांहून अधिक काळापासून सुरू आहे. मात्र, चंद्रशेखर आल्याची माहिती मिळताच अटक करण्यात आली. भीम आर्मीचे (Bhim Army) प्रमुख चंद्रशेखर हे कोरोना आरोग्य साहाय्यकांच्या आंदोलनात सामील होण्यासाठी जयपूरला आले होते. कोरोना आरोग्य साहाय्यकांनी २ जुलै रोजी मोठ्या प्रदर्शनाची घोषणा केली होती. त्यामुळे चंद्रशेखर आझाद (Chandrashekhar) उपस्थित राहण्यासाठी आले होते.
२ जुलै रोजी चंद्रशेखर यांना दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. तेथून चंद्रशेखर यांनी दोन दिवसांसाठी तुरुंगात रवानगी करण्यात आली. राजस्थान सरकारने कोरोना काळात सुमारे २८ हजार कोरोना आरोग्य साहाय्यकांची भरती केली होती. त्यानंतर राज्य सरकारने ३१ मार्च रोजी या सर्व कोरोना आरोग्य साहाय्यकांच्या सेवा समाप्त केल्या होत्या.
खासदार हनुमान बेनिवाल आणि किरोरी लाल मिना यांनी कोरोना साहाय्यकांच्या समर्थनार्थ निषेध केली आहेत. कोरोना साहाय्यकांना कायम करणे शक्य नाही. नियमांनुसारच कायमस्वरूपी केले जाऊ शकते, असे राजस्थान सरकारचे म्हणणे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.