नवी दिल्ली : भारताची लोकसंख्या जगातील दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या असून इथं संपूर्ण जनतेचं लसीकरण करणं हे मोठ आव्हान आहे. पण त्यातही एक समाधानाची गोष्ट समोर आली, ती म्हणजे ओडीशाची राजधानी असलेलं भुवनेश्वर हे शहर शंभर टक्के लसीकरण पूर्ण करणारं देशातील पहिलं शहर ठरलं आहे. भुवनेश्वर महापालिकेच्या उपायुक्तांनी ही माहिती दिली. इंडिया टुडेनं याबाबत वृत्त दिलं आहे. (Bhubaneswar becomes first city in India to vaccinate hundred percent population aau85)
भुवनेश्वर महापालिकेचे साऊथ-ईस्ट झोनल उपायुक्त अंशुमन रथ म्हणाले, "भुवनेश्वरमधील शंभर टक्के लोकसंख्येचं लसीकरण पूर्ण झालं आहे. त्याशिवाय या शहरातील सुमारे एक लाख स्थलांतरीत नागरिकांनाही कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे."
भुवनेश्वर महापालिकेनं ३१ जुलैपर्यंत शंभर टक्के लसीकरणाचं ध्येय निश्चित केलं होतं. या काळात शहरातील १८ वर्षांवरील ९,०७,००० लोकांना कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस देण्यात आले. यामध्ये ३१,००० आरोग्य कर्मचारी, ३३,००० फ्रन्टलाईन वर्कर्स, १८-४५ वयोगटातील ५,१७,००० नागरिक आणि ४५ वर्षांवरील ३,२०,००० नागरिकांना लस देण्यात आली आहे. ३० जुलैपर्यंत एकूण १८,३५,००० कोरोना लसीचे डोस नागरिकांना देण्यात आले आहेत, अशी माहिती अंशुमन रथ यांनी दिली.
अशी केली होती व्यवस्था
कोरोना लसीकरण मोहिमेसाठी भुवनेश्वर शहरात ५५ लसीकरण केंद्रांची उभारणी करण्यात आली होती. यांपैकी ३० केंद्र हे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आणि कम्युनिटी केंद्रांमध्ये होती. तर १० ठिकाणी लसीकरण सुविधा केंद्रे उभारण्यात आली होती. तर जेष्ठांसाठी आणि अपंगांसाठी १५ लसीकरण केंद्रे शाळांमध्ये उभारण्यात आली होती.
शहरवासीय पालिका कर्मचाऱ्यांमुळे शंभर टक्के लसीकरण शक्य
भुवनेश्वरची जनतेने लसीकरण मोहिमेला दिलेला मोठा प्रतिसाद त्याचबरोबर पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मेहनत याच्या जोरावर भुवनेश्वर हे देशातील पहिलं शंभर टक्के लसीकरण पूर्ण करणार शहर ठरलं, असं उपायुक्त रथ यांनी सांगितलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.