Balasore Train Accident: बालासोर रेल्वे अपघातप्रकरणी मोठी कारवाई, सीबीआयने 3 जणांना केली अटक

Odisha Train Accident
Odisha Train Accident esakal
Updated on

CBI action against Balasore train accident : बालासोर रेल्वे अपघातप्रकरणी सीबीआयने 3 जणांना अटक केली आहे, वरिष्ठ विभाग अभियंता अरुणकुमार मोहंता, विभाग अभियंता मोहम्मद अमीर खान आणि तंत्रज्ञ पप्पू कुमार यांना कलम 304 आणि 201 सीआरपीसी अंतर्गत अटक केली आहे.

Odisha Train Accident
Karnataka HC Decision : 'पंतप्रधान मोदींवर टीका करणे अपमानास्पद, मात्र देशद्रोह नाही'; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

ओडिशातील बालासोर येथे 2 जून रोजी झालेल्या भीषण रेल्वे अपघातात सीबीआयने तीन रेल्वे कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. या तिघांनाही आयपीसी कलम 304 अंतर्गत अटक करण्यात आली आहे. या अपघातात 290 हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता.

गेल्या महिन्यात 2 जून रोजी ओरिसातील बालासोर येथे भीषण रेल्वे अपघात झाला होता. या अपघातात 290 हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला असून 1000 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. 4 जून रोजी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची घोषणा केली होती.

2 जून रोजी ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात कोरोमंडल एक्स्प्रेस आणि बेंगळुरू-हावडा एक्स्प्रेस रुळावरून घसरल्याने आणि मालगाडीच्या धडकेत 295 लोक ठार आणि सुमारे 1000 जखमी झाले होते. (latest marathi news)

हावडाहून जाणाऱ्या 12864 बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेसचे अनेक डबे बहंगा बाजार येथे रुळावरून घसरले आणि दुसऱ्या रुळावर पडले. रुळावरून उतरलेले हे डबे १२८४१ शालीमार-चेन्नई कोरोमंडल एक्सप्रेसला धडकले आणि त्याचे डबेही उलटले.

कोरोमंडल एक्सप्रेसचे डबे रुळावरून घसरल्यानंतर मालगाडीला धडकले, त्यामुळे मालगाडीला अपघात झाला. हावडा पासून 255 किमी अंतरावर बहनगा बाजार स्टेशनजवळ हा अपघात घडला होता.

Odisha Train Accident
माझ्या बाप्पाचा रेनकोट कुठंय? पावसातला गणपती पाहून चिमुकल्याचा निरागस प्रश्न | Video Viral

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.