अग्निवीरांसाठी घोषणा; संरक्षण मंत्रालयांतर्गत भरतीमध्ये १० टक्के आरक्षण

Agniveer
Agniveer
Updated on

नवी दिल्ली : अग्निपथ योजनेची (Agneepath sceme) घोषणा झाल्यापासून देशभरातून विरोध होत आहे. अग्निपथ योजनेला विरोध करण्यासाठी तरुण रस्त्यावर उतरले आहेत. देशभरात सुरू असलेल्या निदर्शनांदरम्यान संरक्षण मंत्रालयाने अग्निवीरांबाबत मोठी घोषणा केली आहे. संरक्षण मंत्रालयाने (Ministry of Defense) अग्निवीरांना मंत्रालयांतर्गत भरतीमध्ये १० टक्के आरक्षण देण्याची घोषणा (announcement) केली आहे. संरक्षण मंत्रालयाने ट्विट करून याची माहिती दिली आहे. (10 per cent reservation in recruitment under the Ministry of Defense)

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंत्रालयातील भरतीमध्ये अग्निवीरांसाठी (agniveer) १० टक्के आरक्षणाच्या (reservation) प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. राजनाथ सिंह यांच्याकडून मंजुरी मिळाल्यानंतर आता आवश्यक सुधारणा करण्यात येणार आहे. त्यानंतर या निर्णयाची अंमलबजावणी होईल, असे संरक्षण मंत्रालयाने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Agniveer
२० मांजरींनी घेतला मालकिणीचा जीव; दोन आठवड्यांपासून होत्या उपाशी

अग्निवीरांसाठी विभागाकडून कोणत्या भरती करण्यात येणार आहेत. त्यात आरक्षणाची व्यवस्था केली जाईल. अग्निवीरांना भारतीय तटरक्षक आणि संरक्षण नागरी पदांसह संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या १६ कंपन्यांमध्ये नियुक्तीमध्ये आरक्षण दिले जाईल, असे संरक्षण मंत्रालयाचे (Ministry of Defense) म्हणणे आहे.

अग्निवीरांसाठी १० टक्के आरक्षणाची प्रणाली लागू करण्यासाठी आवश्यक सुधारणा करण्यास सांगितले जाईल, असे संरक्षण मंत्रालयाच्या म्हणणे आहे. यापूर्वी गृह मंत्रालयाने अग्निवीरांना त्यांच्या विभागातील नोकऱ्यांमध्ये १० टक्के आरक्षणाची प्रणाली लागू करण्याची घोषणा केली होती.

Agniveer
Yoga Day : योगा कधी करावा? कोणती आसनं करावीत? जाणून घ्या

कमाल वयोमर्यादेत तीन वर्षांची सूट

अग्निपथ योजनेअंतर्गत सीएपीएफ आणि आसाम रायफल्सच्या भरतीमध्ये चार वर्षे सेवा पूर्ण केलेल्या अग्निवीरांना १० टक्के आरक्षण देण्याची घोषणा करण्यात आली होती. पहिल्या तुकडीच्या अग्निवीरांना कमाल वयोमर्यादेत पाच वर्षांची सूट देण्यात येईल, असेही गृह मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आले आहे. यानंतर अग्निवीरांसाठी कमाल वयोमर्यादेत तीन वर्षांची सूट दिली जाईल, असे गृह मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

देशभरात निदर्शने

अग्निपथ योजनेच्या विरोधात देशभरातील तरुण रस्त्यावर उतरले आहेत. बिहार-बंगालपासून तेलंगणापर्यंत अग्निपथ योजनेच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. बिहारमध्ये सलग तिसऱ्या दिवशी हिंसक निदर्शने झाली. आंदोलकांनी मसौधीमध्ये रेल्वे स्टेशन जाळले, तर उत्तर प्रदेशच्या जौनपूरमध्ये रोडवेजची बस पेटवली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.