Zomato ला मोठा झटका! GST ची नोटीस 11.81 कोटी भरण्याचे आदेश

कंपनीला नोटीसमध्ये दिलेल्या आदेशात जुलै 2017-मार्च 2021 या कालावधीसाठी 5.9 कोटी रुपयांची जीएसटी मागणी आणि 5.9 कोटी रुपयांच्या दंडाचा समावेश आहे.
Zomato Notice of GST
Zomato Notice of GSTesakal
Updated on

फूड डिलिव्हरी कंपनी Zomato ला GST नोटीस मिळाली आहे. कंपनीला जीएसटी विभागाकडून 11 कोटी 81 लाख रुपयांची कर आणि दंडाची नोटीस प्राप्त झाली आहे. जुलै 2017 ते मार्च 2021 दरम्यान भारताबाहेरील उपकंपन्यांना प्रदान केलेल्या निर्यात सेवांच्या बाबतीत नोटीस प्राप्त झाली आहे.

कंपनीला नोटीसमध्ये दिलेल्या आदेशात जुलै 2017-मार्च 2021 या कालावधीसाठी 5.9 कोटी रुपयांची जीएसटी मागणी आणि 5.9 कोटी रुपयांच्या दंडाचा समावेश आहे. झोमॅटोने स्टॉक एक्स्चेंजला सांगितले की कंपनीला केंद्रीय GST, गुरुग्रामच्या अतिरिक्त आयुक्तांकडून जुलै 2017 ते मार्च 2021 या कालावधीसाठी 5,90,94,889 रुपयांचा दंड ठोठावण्याचा आदेश प्राप्त झाला आहे.

फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोने शेअर बाजाराला सांगितले की, कंपनी या नोटिशीच्या विरोधात अपील दाखल करणार आहे. कंपनीला यापूर्वीही अशी नोटीस मिळाली आहे. ती नोटीस कर्नाटकातील सहाय्यक व्यावसायिक कर आयुक्तांकडून प्राप्त झाली आहे. या नोटीसद्वारे झोमॅटोकडून 23 कोटी 26 लाख रुपयांचा कर, दंड आणि व्याजाची मागणी करण्यात आली होती.

Zomato Notice of GST
Uddhav Thackeray: जनाची नाही तर मनाची ठेवा...देवेंद्र फडणवीसांवर बोलताना उद्धव ठाकरेंचं आक्षेपार्ह वक्तव्य!

शुक्रवारी झोमॅटोचे शेअर्स सुमारे 2 टक्के च्या वाढीसह बंद झाले. त्याच्या शेअरची किंमत सध्या 188.50 रुपयांवर बंद झाली आहे. मात्र याआधी झोमॅटोचे शेअर 5 दिवस घसरले होते. स्टॉक सुमारे 5 टक्के घसरला होता. झोमॅटोच्या शेअर्सनी गेल्या महिन्यात गुंतवणूकदारांना 11 टक्के परतावा दिला होता. त्याच वेळी, जर आपण गेल्या एका वर्षाबद्दल बोललो तर त्याच्या शेअर्समध्ये 73 टक्के पर्यंत वाढ झाली आहे. आता Zomato चे शेअर्स पुन्हा वाढण्याची अपेक्षा आहे.

Zomato Notice of GST
Nikhil Kamath: "आपण सगळे मरणार आहोत..." झिरोधाचे सह-संस्थापक निखिल कामथ असं का म्हणाले?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.