इंफाळ : गेल्या जवळपास दोन महिन्यांपासून ईशान्येकडील राज्य मणिपूर धुमसतंय. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जातीय हिंसाचार सुरु असून यामध्ये शेकडो जणांना जीव गमवावे लागलेत तसेच मालमत्तांचं देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.
यापार्श्वभूमीवर आज संध्याकाळी इंफाळमधील भाजपच्या कार्यालयाबाहेर स्थानिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. यावेळी गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या. याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. (Big crowd outside BJP office in Manipur Imphal Police broke tear gas Video viral)
एएनआयच्या माहितीनुसार, इंफाळमधील भाजपच्या प्रादेशिक कार्यालय परिसरात मोठ्या प्रमाणावर सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. संध्याकाळी मोठ्या प्रमाणावर भाजप कार्यालयाबाहेर स्थानिकांची गर्दी जमलयानं सुरक्षेच्या कारणास्तव इथं बदोबस्त वाढवण्यात आला आहे. पण आता ही गर्दी पांगवण्यात आली असून इथली परिस्थिती नियंत्रणात आहे.
मणिपूरमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून दोन आदिवासी जमातींमध्ये संघर्ष पहायला मिळतो आहे. यामुळं मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला असून यामध्ये आत्तापर्यंत १३१ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर शेकडो जण बेघर झाले आहेत. आंदोलकांनी भाजपच्या मंत्र्यांच्या घरांना आग लावल्याच्या घटना इथं घडल्या आहेत.
इतक्या मोठ्या कालावधीपासून मणिपूर जळत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अद्याप इथल्या परिस्थितीवर कुठलंही भाष्य केलेलं नाही. इतर वेळी कुठल्याही छोट्या मोठ्या गोष्टीसाठी ते ट्विट करतात पण अद्याप मणिपूरच्या स्थितीवर एखाद ट्विट करणंही त्यांनी टाळलं आहे. यामुळं विरोधकांच्या मोठ्या टीकेलाही त्यांनी सामोरं जाव लागतं आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज मणिपुरला भेट दिली. इंफाळवरुन ते प्रत्यक्ष हिंसाचार घडला त्या ठिकाणी रस्ते मार्गानं निघाले होते. पण पोलिसांनी त्यांच्या ताफ्याला या मार्गावरुन जाण्यास मज्जाव केला. कारण त्यांच्या ताफ्यावरही हल्ल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. त्यामुळं त्यांनी हेलिकॉप्टरचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला. त्यामुळं त्यांनी शेवटी हवाई प्रवास करत पीडितांच्या कॅम्पला भेट दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.