Bharatpur : बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवण्यावरून मोठा वाद; दोन जातींमध्ये जोरदार हाणामारी

राजस्थानमधील (Rajasthan) भरतपूरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा (Dr. Babasaheb Ambedkar Statue) बसवण्यावरून मोठा वाद निर्माण झालाय.
Dr. Babasaheb Ambedkar Statue
Dr. Babasaheb Ambedkar Statueesakal
Updated on
Summary

पोलिसांनी अतिरिक्त फौजफाटा मागवून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. हल्लेखोरांना पांगवण्यासाठी त्यांनी अश्रुधुराचा वापर केला.

भरतपूर : राजस्थानमधील (Rajasthan) भरतपूरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा (Dr. Babasaheb Ambedkar Statue) बसवण्यावरून मोठा वाद निर्माण झालाय.

12 एप्रिलच्या रात्री हा वाद इतका वाढला की, दंगलीसारखी परिस्थिती निर्माण झाली. दोन जातींनी परस्पर संघर्षात केवळ जाळपोळ आणि रस्ता जाम केला नाही, तर त्यांनी पोलिसांवर तीन वेळा दगडफेक केली.

यानंतर पोलिसांनी अतिरिक्त फौजफाटा मागवून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. हल्लेखोरांना पांगवण्यासाठी त्यांनी अश्रुधुराचा वापर केला. राजस्थानमध्ये या वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यादृष्टीनं येथील नेते विविध उपक्रम राबवत आहेत.

Dr. Babasaheb Ambedkar Statue
Rajasthan : CM गेहलोत यांच्यासमोरच PM मोदींनी काँग्रेससह लालूंना झाडलं; म्हणाले, स्वार्थासाठी यांनी..

दरम्यान, नदबई येथील काँग्रेसचे आमदार जोगेंद्रसिंह अवाना यांनी नुकतेच बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा येथील चौकात बसवणार असल्याची घोषणा केली. त्यांनी ही घोषणा करताच जाट समाजानं याला विरोध केला. या चौकात भरतपूरचे संस्थापक महाराजा सूरजमल यांचा पुतळा बसवण्याची मागणी जाट समाजानं केलीये.

Dr. Babasaheb Ambedkar Statue
Karnataka Election : भाजपकडून 23 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; यादीतून माजी मुख्यमंत्र्यांचं नाव गायब

12 एप्रिल रोजी जाट समाजातील काही सदस्य काँग्रेस आमदार जोगेंद्रसिंह अवाना यांच्या विरोधात धरणे धरले होते. अचानक या आंदोलकांनी रस्त्यावर आंदोलन करत चक्का जाम केला. पोलिसांना याची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पोलिसांच्या वाहनांवरच दगडफेक सुरू केली. याप्रश्नी रात्री उशिरा पोलीस आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक झाली. मात्र, अद्याप यावर कोणताही तोडगा निघाला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()