NEET पेपर लीक प्रकरणात मोठा खुलासा! 'सेफ हाऊस'मध्ये 2 दिवस काय घडलं?, प्रत्यक्षदर्शीने सांगितली संपूर्ण कहाणी

Big Update in NEET paper leak case : नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (NEET-UG) 2024 ही नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे 571 शहरांमधील 4,750 केंद्रांवर 24 लाखांहून अधिक उमेदवारांसाठी घेण्यात आली होती.
NEET paper leak case
NEET paper leak caseesakal

नीट पेपर लीक प्रकरणामुळे देशभरात खळबळ माजली आहे. एखाद्या चित्रपटाला लाजवेल, अशा प्रकारे हे प्रकरण घडलं आहे. याबाबत अनेक खुलासे देखील समोर येत आहेत. परीक्षेच्या NEET UG परीक्षेच्या एक दिवस आधी काही उमेदवारांना सेफ हाऊसमध्ये ठेवण्यात आले होते आणि त्यांच्याकडून प्रश्नपत्रिका पाठ करुन घेतल्या. हे सेफ हाऊस आशुतोष नावाच्या माणसाच्या नावावर भाड्याने होते. दरम्यान आशुतोषने संपूर्ण घटना सांगितली.

आशुतोषने आज तकला झालेली संपूर्ण घटना सांगितली. नीट परिक्षेच्या एक दिवस आधी त्याचा मित्र मनिष ५-७ विद्यार्थी घेऊन त्याच्याकडे आला होता. ५ मेला सकाळी बघितलं तर १५ पेक्षा ज्यास्त विद्यार्थी त्याच्या खोलीत होते. "माझा मित्र मनीष याने सांगितले की हे माझ्या ओळखीचे विद्यार्थी आहेत. उद्या नीट परीक्षा आहे तर यांना रात्रभर राहू द्या. सकाळी ते निघून जातील. मी म्हटलं राहूदे पण एकदा प्रभात भैया यांच्याशी बोलून घ्या. मात्र त्यांनी प्रभात भैया यांच्या चर्चा केली नाही", असे आशुतोषने सांगितले.

रात्री ११ माझ्या मित्र  ५ ते ७ विद्यार्थी घेऊन आला. ५ मेला सकाळी १५ लोक होते. सकाळी १० वाजेपर्यंत सकाळी सर्व रुममध्ये बसून होते. मनीषच्या हातात एका पेपरीची फोटोकॉपी होती. त्याने सर्वा विद्यार्थ्यांनी त्याची प्रिंट दिली. त्यानंतर मनीष सर्व विद्यार्थ्यांनी घेऊन मागच्या रस्त्याने निघून गेला.

आशुतोष म्हणाला, "5 मे रोजी  NEET UG परीक्षा दुपारी 2 वाजता सुरू झाली. सर्व उमेदवार निघून गेले होते. मी समोरच्या खोलीत बसलो होतो. त्यानंतर मी 5 तारखेला जमशेदपूरला गेलो होतो, तेव्हा मला कळलं की त्या खोलीवर पोलिसांनी छापा टाकला. छाप्याची बातमी समजल्यानंतर मी माझा मोबाईल बंद केला. मी माझ्या पत्नीच्या फोनवरून प्रशासनाशी बोललो. माझ्याकडून चूक झाली असे मी भावाला सांगितले. माझी चूक म्हणजे मनीषने पोरांना आणले आणि मी त्याला राहू दिले."

NEET paper leak case
Paper Leak Law: NEET, JEE परीक्षेतली पेपरफुटी, फसवणूक टाळण्यासाठी केंद्रानं उचललं मोठं पाऊल

ईओयूचे उपमहानिरीक्षक (डीआयजी) मानवजीत सिंग धिल्लन म्हणाले होते की NEET प्रश्नपत्रिका आणि उत्तरे लक्षात ठेवण्याच्या बदल्यात मोठा व्यवहार केल्याचा पुरावा देखील सापडला आहे. तपासादरम्यान सहा पोस्ट-डेट चेकही जप्त करण्यात आले आहेत. EOU अधिकाऱ्यांनी सेफ हाऊसमधून अर्धवट जळलेल्या प्रश्नपत्रिकाही जप्त केल्या होत्या.

परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देणाऱ्यांना पालकांनी प्रत्येक उमेदवारामागे ३० लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे दिल्याचे चौकशीदरम्यान उघड झाले आहे.  देशभरातील सरकारी आणि खाजगी संस्थांमधील MBBS, BDS, आयुष आणि इतर संबंधित अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी NTA द्वारे NEET-UG परीक्षा घेतली जाते.

नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (NEET-UG) 2024 ही नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे 571 शहरांमधील 4,750 केंद्रांवर 24 लाखांहून अधिक उमेदवारांसाठी घेण्यात आली होती.

NEET paper leak case
NEET Paper Leak: पाटण्यातल्या ज्या शाळेत 'नीट' परीक्षेचे प्रश्नोत्तरं पाठ करुन घेतले, त्या घरमालकाची मुलगीसुद्धा MBBS

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com