पाटना- बिहारमधून एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका फेक डॉक्टरने एका १५ वर्षीय मुलाचा युट्यूबवरील व्हिडिओ पाहून ऑपरेशन केला आहे. यात या अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 'एनडीटीव्ही'ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
रिपोर्टनुसार, बिहारच्या सरनमध्ये गणपती नावाचे एक हॉस्पिटल आहे. हे हॉस्पिटल एका फेक डॉक्टरच्या माध्यमातून चालवले जात होते. मृत मुलाच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगा वारंवार उलटी करत होता. त्यामुळे त्याला गणपती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. याठिकाणी पालकांच्या संमतीशिवाय मुलाचे पित्ताशयाचा खडा काढण्याचे ऑपरेशन करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.