Ganga River: अंत्यसंस्कारानंतर स्नानासाठी जाताना दुर्घटना! गंगा नदीत बोट उलटल्याने ५ जण बुडाले, माजी NHAI अधिकाऱ्याचाही समावेश

Boat collapses in Patnas Ganga River: गंगा दसऱ्याच्या दिवशी बिहारच्या पाटणामध्ये पुरामुळे गंगेत बोट उलटल्याने १७ जणांचा बुडाले. ज्यात ५ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. 13 जणांना वाचवण्यात यश आले आहे. बुडालेल्यांमध्ये एनएचएआयच्या माजी अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.
Boat collapses in Patnas Ganga River
Boat collapses in Patnas Ganga RiverEsakal
Updated on

राजधानी पाटणा येथील उमाशंकर घाटात आज (रविवारी) पहाटे पूर आलेल्या पाच जणांचा गंगेत बुडून मृत्यू झाला आहे. मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी सर्वजण नालंदाहून आले होते. अंत्यसंस्कारानंतर गंगेच्या पलीकडे बोटीतून स्नानासाठी जात असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे.

एनएचएआयचे माजी प्रादेशिक अधिकारी अवधेश कुमार आणि त्यांच्या मुलासह पाच जणांचा बुडणाऱ्यांमध्ये समावेश आहे. एनडीआरएफची टीम बुडालेल्यांचा शोध घेत आहे. पाटणा डीएम सर कपिल अशोक देखील घटनास्थळी पोहोचले आणि घटनेची संपूर्ण माहिती घेतली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Boat collapses in Patnas Ganga River
Lok Sabha Speaker : भाजपचं टेन्शन वाढलं! लोकसभा अध्यक्ष पदासाठी चंद्राबाबू नायडूंची 'ही' अट; नितीश कुमारांची भूमिका काय?

पाटण्याचे एसएसपी राजीव मिश्रा यांनी सांगितले, एकाच परिवारातील १७ जण एकाच बोटीतून प्रवास करत होते. यामधील १२ जणांना वाचवण्यात यश आले आहे. स्थानिकांसह, नावाड्यांनी त्यांना वाचवले. एसडीआरएफची टीमही घटनास्थळी पोहोचली असून गंगेत बुडालेल्या लोकांचा शोध घेण्यात आला आहे.

Boat collapses in Patnas Ganga River
Mandla Crime: फ्रीजमध्ये गोमांस ठेवल्याचा आरोप, बुलडोझरने 11 घरे केली जमीनदोस्त, नेमकं काय घडलं?

बोट दुर्घटनेत बुडालेल्यांमध्ये अवधेश कुमार (६० वर्षे), त्यांचा मुलगा नितीश कुमार (३० वर्षे), हरदेव प्रसाद (६५ वर्षे) आणि एका महिलेसह एकूण पाच जणांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच बरहचे एसडीएम, एएसपी, पोलीस स्टेशन प्रभारीही तेथे पोहोचले आणि एसडीआरपीएफ टीमला पाचारण करण्यात आले. आतापर्यंत बुडालेल्यांचा शोध लागलेला नाही.

Boat collapses in Patnas Ganga River
In Revised NCERT Textbook: 'बाबरी मशिदीचे नाव गायब! NCERTच्या नवीन पाठ्यपुस्तकात अयोध्या वादाचं पुनर्लेखन

अवधेश कुमार या वर्षी फेब्रुवारीमध्ये NHAI च्या प्रादेशिक अधिकारी पदावरून निवृत्त झाले. नालंदा येथील अस्तवन येथील मालती गावात राहणारे अवधेश कुमार यांच्या आईचे निधन झाले होते. त्यांच्या अंत्ययात्रेला गावातील अनेक लोक आले होते. अंतिम संस्कार पूर्ण झाल्यानंतर 17 जण बोटीत बसून गंगेच्या पलीकडे स्नानासाठी जात होते. यादरम्यान बोट उलटली. यापैकी 12 जणांना वाचवण्यात यश आले आहे. पाच जणांचा गंगेत बुडून मृत्यू. बुडालेल्यांबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.