नवी दिल्ली : बिहारमधील नितीश कुमार सरकारनं जातनिहाय जनगणनेची आकडेवारी अखेर जाहीर केली आहे. अशा प्रकारे देशात पहिल्यांदाच एखाद्या राज्यानं जातनिहाय जनगणना केली आहे.
गांधी जयंतीचं औचित्य साधत बिहारचे मुख्य सचिव आमिर सुबहानी यांनी सोमवारी ही आकडेवारी जाहीर केली. या जनगणेतून बिहारमधील विविध समाजाच्या लोकसंख्येबाबत अनेक महत्वाच्या बाबी स्पष्ट झाल्या आहेत. (Bihar caste survey released OBCs EBCs together account for 63 perc of total population )
बिहारनं केलेल्या जातनिहाय जनगणनेत हिंदूंची एकूण संख्या ८१.९९ टक्के म्हणजेच सुमारे ८२ टक्के आहे. तर मुस्लिमांची संख्या १७.७ टक्के आहे. इतरांमध्ये ख्रिश्चन, शीख, बौद्ध, जैन धर्मियांची लोकसंख्या १ टक्क्याहून कमी आहे. तर राज्यातील २,१४६ लोक निधर्मी आहेत. (Latest Marathi News)
सर्वसाधारण वर्ग - १५.२२ टक्के
मागास वर्ग - २७.१२ टक्के
ओबीसी - ३६.१ टक्के
अनुसुचीत जाती - १९.६५ टक्के
अनुसुचीत जमाती - १.६८ टक्के
ब्राह्मण - ३.६७ टक्के
राजपूत - ३.४५ टक्के
भूमिहार - २.८९ टक्के
कायस्थ - ०.६० टक्के
यादव - १४.२६ टक्के
कुरमी - २.८७ टक्के
तेली - २.८१ टक्के
मुसहर - ३.०८ टक्के
सोनार - ०.६८ टक्के
बिहारमध्ये नितीश कुमार हे भाजपसोबत सत्तेत असतानाच राज्यात जातनिहाय जनगणना करण्याचा प्रस्ताव विधानसभा आणि विधानपरिषदेत मंजूर झाला होता. कोरोनाची स्थिती सुधारल्यानंतर १ जून २०२२ रोजी सर्वपक्षीय बैठकीत सर्वसंमतीनं जातनिहाय जनगणना करण्याचं मान्य करण्यात आलं होतं.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.