नवी दिल्ली- जेडीयू प्रमुख नितीश कुमार यांनी आज सकाळी राज्यपालांची वेळ मागितली आहे. त्यामुळे ते आज मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतील हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. आज बिहारमध्ये राजकीय उलथापालथ पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आज संपूर्ण देशाचे या घडामोडींकडे लक्ष असणार आहे.(Bihar Chief Minister Nitish Kumar has sought time to meet the Governor today morning for resign)
जेडीयू भारतीय जनता पक्षासोबत जाण्याची दाट शक्यता आहे. त्यासंदर्भात हालचाली सुरु झाल्याचं दिसत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारचा तेलंगणा दौरा रद्द केला आहे. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा हे रविवारी पाटण्याला जाण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे बिहारमध्ये आज आपल्याला नवीन राजकीय समीकरण पाहायला मिळू शकतं.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीश कुमार आज पक्षाच्या आमदारांना सकाळी दहा वाजता संबोधित करतील आणि त्यानंतर ते राजीनामा देण्यासाठी राजभवन येथे जातील. त्यानंतर भाजपच्या पाठिंब्याने नवे सरकार स्थापन केले जाईल. आज रात्रीच नवे सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे.
- नितीश कुमार यांना बिहारमधील अनेक छोटे पक्ष एकत्र आणण्यास यश आलं. पण, इंडिया आघाडीमध्ये सुसुत्रता दिसली नाही. लोकसभा निवडणुका जवळ आल्या तरी इंडिया आघाडीला अद्याप आपला नेता आणि अजेंडा ठरवता आलेला नाही. यामुळे नितीश कुमार अस्वस्थ झाले होते असं सांगितलं जातं.
- जेडीयू प्रवक्ते केसी त्यागी पत्रकांराना सांगितलं होतं की, इंडिया आघाडीत फूट पडण्याच्या मार्गावर आहे. तसेच काँग्रेसमधील काही नेते नितीश कुमार यांचा वारंवार अपमान करत आहेत.
- काँग्रेसकडून सांगण्यात आलं होतं की, भाजप इंडिया आघाडीला कमकूवत करण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपच्या या प्रयत्नानंतरही इंडिया आघाडी एकसंध आहे
- राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद या राजकीय घडोमोडींकडे लक्ष ठेवून आहेत. तसेच यातून आपल्या पक्षासाठी कोणता उत्तम पर्याय असेल याचा शोध घेत आहेत. आरजेडीचे प्रवक्ते जनार्दन सिंग सिग्रीवाल यांनी सूचक वक्तव्य केलं होतं. २०२० मध्ये एनडीएला बिहारच्या जनतेने कौल दिला होता. आता पुन्हा एकदा एनडीए सत्तेत येणार आहे, असं ते म्हणाले होते.
- सूत्रांच्या माहितीनुसार, जेडीयू आणि भाजपच्या चर्चांमध्ये रेणू देवी आणि तारकिशोर प्रसाद या दोघांना उपमुख्यमंत्रीपदाची संधी दिली जाणार आहे . आज भाजप आणि जेडीयूचे नेते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी येऊ शकतात. त्यानंतर पुढे जाण्याचा निर्णय नितीश कुमार जाहीर करु शकतात.
- राम विलास पासवान यांचे पुत्र आणि लोक जनशक्ती पार्टीचे प्रमुख चिराग पासवान यांनी शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली होती. भाजप-जेडीयू सोबत गेल्यानंतर आपली भूमिका स्पष्ट करु असं ते म्हणाले आहेत.
- आरजेडीकडे सध्या ७९ आमदार असून बिहारमध्ये सर्वात मोठा पक्ष आहे. आरजेडीचे काँग्रेस आणि इतर तीन पक्षांसोबत महागठबंधन आहे. नितीश कुमारांनी वेगळी चूल मांडली तर महागठबंधनला आठ जागा कमी पडतील.
- बिहारमध्ये हिंदुस्तान आवाम मोर्चाचे जितन राम मांझी यांना महत्व आलं आहे. त्यांच्याकडे सध्या चार आमदार आहेत. त्यामुळे आरजेडी मांझी यांच्या संपर्कात असल्याचं सांगितलं जातं.
-नितीश कुमार यांनी अठरा महिन्यांपूर्वीच भाजपला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर ते आरजेडी-काँग्रेससोबत गेले होते. २०१७ मध्ये नितीश कुमार यांनी आरजेडीसोबत संबंध तोडले होते. या सर्व काळात ते मुख्यमंत्रीपदी कायम राहिले आहेत. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.