Rahul Gandhi Video : राहुल गांधी स्टेजवर आले अन् अचानक काही भाग खचला; तुटलेल्या स्टेजवरूनच...

Rahul Gandhi Video : राहुल गांधींच्या रॅलीचा स्टेज कोसळल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये आरजेडी नेत्या मीसा भारती यांचा हात धरलेला दिसत आहे.
Rahul Gandhi Video
Rahul Gandhi VideoEsakal
Updated on

लोकसभा निवडणूक 2024 साठी मतदानाचे सहा टप्पे पार पडले असून आता फक्त सातव्या टप्प्याचे मतदान बाकी आहे, जे 1 जून रोजी होणार आहे. याआधी मतदानाच्या शेवटच्या टप्प्यापूर्वी राजकीय पक्षांचे नेते निवडणूक प्रचारात आपली सर्व शक्ती पणाला लावत आहेत. निवडणूक प्रचारादरम्यान बिहारमधील पाटलीपुतीर येथे एका सभेत राहुल गांधी खाली पडताना थोडक्यात बचावले आहेत. राहुल यांच्या उपस्थितीत अचानक रॅलीचा स्टेज कोसळला. या दुर्घनेत कोणालाही दुखापत झाली नाही.

पाटलीपुत्र येथे एका निवडणूक रॅलीदरम्यान स्टेज अचानक तुटला, त्यामुळे राहुल गांधीही खाली पडता पडता थोडक्यात बचावले. मंचावर उपस्थित असलेल्या आरजेडी नेत्या आणि उमेदवार मीसा भारती यांनी त्यांचा हात धरला. या घटनेमुळे रॅलीच्या ठिकाणी काही काळ गोंधळाचे वातावरण होते, मात्र नंतर सर्व काही सुरळीत झाले.

Rahul Gandhi Video
Amit Shah: उद्धवजी मित्र होते, शरद पवारांनी तोडले...ज्यांनी खेळ सुरु केला त्यांना संपवावा लागेल; अमित शहांचं मोठं वक्तव्य!

आज (सोमवारी) काँग्रेस नेते राहुल गांधी इंडिया आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आणि जनतेकडून मते मागण्यासाठी बिहारमध्ये आले होते. बिहारमधील त्यांच्या तीन जाहीर सभा पटना साहिब, पाटलीपत्र आणि आराह येथे होणार होत्या. याची सुरुवात पटना साहिब लोकसभेच्या बख्तियारपूरपासून झाली जिथे मीरा कुमार यांच्या मुलाने काँग्रेस उमेदवार अविजित अंशुल यांना मत देण्याचे आवाहन केले आणि दावा केला की नरेंद्र मोदी पुढच्या वेळी पंतप्रधान होणार नाहीत. यानंतर राहुल गांधी मीसा भारतीसाठी मते मागण्यासाठी पाटलीपत्र लोकसभेच्या पालीगंजमध्ये पोहोचले.

Rahul Gandhi Video
Swati Maliwal : स्वाती मालिवाल आम आदमी पार्टी सोडणार?, स्वतःच केला खुलासा; विभव कुमारचा जामीन कोर्टाने फेटाळला

आयोजित जाहीर सभेच्या मंचावर उपस्थित होते. त्याच दरम्यान छोटा अपघात झाला. ज्या स्टेजवरून राहुल भाषण करणार होते, त्या स्टेजचा काही भाग खाली पडला. आरजेडी उमेदवार मीसा भारती तिथे उपस्थित होत्या. त्यांनी राहुल गांधींचा हात धरून त्यांना सावरले.

राहुल गांधी पाटणा येथील पालीगंजमध्ये सभा घेत आहेत. राहुल स्टेजवर पोहोचताच स्टेजचा एक भाग आतल्या बाजुला गेला. आरजेडीच्या उमेदवार मीसा भारती यांनी राहुल गांधींचा हात धरून त्यांना सावरले. काही वेळाने सुरक्षा कर्मचारीही तेथे पोहोचले, मात्र राहुलने तो ठीक असल्याचे सांगितले. यावेळीही राहुल हसत हसत लोकांना अभिवादन करताना दिसले. मात्र, सभेत काही काळ गदारोळ झाला. मात्र राहुल गांधींच्या अभिवादनानंतर परिस्थिती सामान्य झाली. सभेच्या शेवटी राहुल गांधींनी जनतेला संबोधित केले.

Rahul Gandhi Video
Prajwal Revanna: 'मी 31 मे रोजी SIT समोर हजर होणार', सेक्स स्कँडलमध्ये अडकलेल्या प्रज्वल रेवण्णाने दिली पहिली प्रतिक्रिया

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.